बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठी सिनेमाचा सोनेरी काळ पाहिलेल्या ‘किबे लक्ष्मी थिएटर’चा पडदा कायमचा बंद होणार?

पुणे | ‘किबे लक्ष्मी थिएटर’ हे मराठी चित्रपटांचं माहेरघर आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्वांचं लाडकं असलेल्या या थिएटरने मराठी चित्रपटांचा सोनेरी काळ पाहिला आहे. किबे लक्ष्मी थिएटर म्हणजे मराठी सिनेमांसाठी हक्काचं ठिकाण. पण मराठी चित्रपटाच्या सोनेरी काळाचं साक्षीदार असलेलं हे किबे लक्ष्मी थिएटर आता कायमचं बंद होण्याची शक्यता आहे.

किबे लक्ष्मी थिएटर यापुढे न चालवण्याचा निर्णय मालकांनी घेतला आहे. हे थिएटर कायमस्वरूपी बंद होणार किंवा दुसऱ्या कोणालातरी करारतत्वाने चालवायला दिले जाणार असल्याचे संकेत मालकाकडून देण्यात आले आहे. किबे थिएटरची धूरा अजय किबे आणि सुरेश किबे या बंधूंच्या हाती होती. सुरेश किबे हे पुण्यात वास्तव्यास असल्याने थिएटरची संपुर्ण जबाबदारी तेच सांभाळत होते.

पण दुर्देवाने सुरेश किबे यांचं तीन महिन्यांपूर्वी निधन झालं. त्यामुळे आता थिएटर चालवायचं कसं?, हा मोठा प्रश्न अजय किबे यांच्यासमोर आहे. थिएटर कायमस्वरूपी बंद करणे किंवा पुन्हा करारस्वरूपी कोणालातरी चालवायला देणे हे दोन पर्याय त्यांच्यासमोर आहेत. यानुसार त्यांनी काही व्यक्तींशी बोलणी देखील सुरू केली आहे. भावाच्या निधनानंतर आम्ही थिएटर न चालवण्याचा पक्का निर्णय घेतला असल्याचं अजय किबे यांनी सांगितलं आहे.

या चित्रपटगृहाला चालवण्याची जबाबदारी विष्णूपंत दामले, व्ही. शांताराम, एस. फत्तेलाल, सीताराम बी. कुलकर्णी, केशवराव धायबर या नामवंतांनी त्य़ाकाळात उचलली होती. त्यांच्या ‘प्रभात फिल्म कंपनी’वरून थिएटरचं नाव ‘प्रभात थिएटर’ ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर इंदूरचे संस्थानिक रामचंद्र किबे यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ थिएटरचं ‘किबे लक्ष्मी थिएटर’ असं नामकरण केलं. पण मराठी चित्रपटाचे सोनेरी दिवस अनुभवलेलं हे थिएटर काळाच्या पडद्याआड जाण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

देशातुन कोरोना लवकरच हद्दपार होणार?, 8 महिन्यातील सर्वात कमी कोरोना रूग्णांची नोंद

आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढणार?, तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे!

महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविना?, महाविकास आघाडीला ‘या’ गोष्टीची भीती

“…तोपर्यंत समीर वानखेडे यांनी राजीनामा द्वावा”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More