बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी द्या’; शेतकऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बुलडाणा | महाराष्ट्रात आता पावसाचं आगमन झालं आहे. सर्व शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या बियाणांची खरेदी देखील चालू झाली आहे. बियाणांसाठी पैसे नसल्यानं शेतकऱ्यांनी आता बँकेचा रस्ता धरला आहे. नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँका तिसलट करत असल्याचं चित्र समोर येत आहे. अशीच एक घटना बुलडाण्यातील एका शेतकऱ्यासोबत घडली आहे.

बँकाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून बुलडाण्यातील मलकापूर तालुक्यातील लोणवडी येथील शेतकऱ्याने आता त्याची किडनी विकायला काढली आहे. पेरणीसाठी पैसे नाहीत म्हणून त्याने बँकेत कर्जासाठी धाव घेतली होती. मात्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी  शेतकऱ्याला त्रास दिला. त्यानंतरही पैसे मिळवण्यासाठी त्यानं धावाधाव केली परंतू अखेर त्याच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे त्याने आपली किडनी विकण्याचा निर्णय घेतला.

शेतकऱ्याने पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी थेट मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत त्‍यांनी हे निवेदन काल पाठवलं आहे. शेतकऱ्याच्या या अजब निवेदनामुळे सरकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. पेरणीचे दिवस जवळ आल्यानं पीक कर्जाची आवश्यकता असताना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यानं दिला आहे.

दरम्यान, लॉकडाऊन यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच, यापूर्वी झालेली अतिवृष्टी, नापिकी यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांना यावर्षी मागील कर्ज फेडता आलं नाही. त्यामुळे आता त्या शेतकऱ्यांना आणखी कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“काँग्रेसच्या अस्तित्वासाठी राहुल गांधींना मजबूत टीम तयार करावीच लागेल”

पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील लाकडी भागाला आग

नवी मुंबईतील विमानतळाला ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचं नाव – एकनाथ शिंदे

“आपल्या मुली पळून जाऊ द्यायच्या नसतील तर त्यांना फोनपासून दूर ठेवा”

‘…अन्यथा आणखी वाईट परिस्थिती ओढवेल’; सिब्बलांचा पक्षनेतृत्वाला इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More