बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बेड द्या नाहीतर माझ्या वडिलांना इंजेक्शन देऊन मारुन तरी टाका’; वडिलांना तडफडताना पाहून मुलगा संतापला

चंद्रपूर | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांनी त्यांचा जीव गमवला आहे. तर आता कोरोना रुग्णांना बेड देखील मिळणं कठीण झालं आहे. अशातच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या वडिलांना कोरोनाने होणारा त्रास पाहून एका मुलाने संताप व्यक्त केला आहे.

चंद्रपूरातील एका तरूणाला कोरोना पीडित वडिलांच्या उपचारासाठी 24 तास अनेक हॉस्पिटलच्या फेऱ्या मारव्या लागल्या आहेत. त्यानंतर देखील त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. त्यानंतर मुलाने माझ्या वडिलांना बेड द्या नाहीतर त्यांना मारून टाका असं म्हटलंय.

सागर त्याच्या वडिलांना घेऊन मुंबईहून चंद्रपूरला गेले होता. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने याठिकाणी आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत. पहिल्यांदा चंद्रपूरातील वरोरा येथील हॉस्पिटलला घेऊन गेला पण तिथे बेड मिळाला नाही. त्यानंतर अनेक खासगी रुग्णालयात नेलं. पण तेथेही उपचार होऊ शकले नाहीत. अखेर त्याच्या वडीलांवर एम्ब्युलन्समध्येच उपचार करण्यात येत आहेत.

आपल्या वडिलांना रुग्णवाहिकेत तडफताना पाहून सागर खूप निराश झालाय. एम्ब्युलन्समधील ऑक्सिजनही आता संपणार आहे. त्यामुळे माझ्या वडिलांना उपचारासाठी बेड द्या नाहीतर त्यांना इंजेक्शन देऊन मारून टाका, अशी मागणी प्रशासनाकडे करत आहे. तसेच मी त्यांना अशा अवस्थेत घरी घेऊन जाऊ शकत नाही, असं देखील सागरने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झालंय”

पुणे हादरलं! निवृत्त पोलीस अन् गुन्हेगारात वाद झाल्यानंतर गुन्हेगाराचा विचित्र मृत्यू

संजय राऊतांनंतर राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर बेळगावात, मराठी माणसाचा प्रचार करणार!

“ज्यांनी भांडणं लावून लोकांची घरं फोडली, त्यांच्या घरात आता टोकाची भाडणं”

भावोजींच्या प्रेमापोटी मेहुणीनं आपल्या पतीसोबत केलं हे धक्कादायक कृत्य

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More