Top News महाराष्ट्र मुंबई

‘एका दगडात दोन पक्षी मारत’, चंद्रकांत पाटलांनी पवारांना शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

मुंबई | ‘महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल 50 वर्ष पूर्ण करून अनेक राजकीय नेत्यांसाठी आदर्श असणारे मा.शरद पवार  यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. तुमच्या कार्याच्या अनुभवाचा फायदा आघाडी सरकारला व्हावा, अशी आशा आहे. तुम्हाला उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना’, असं ट्विट करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या.

कोरोना काळातही वयाची पर्वा न करता, आपल्या सहयोगी पक्षातील काही नेत्यांना लाजवतील असे दौरे आपण केले, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा घेतला आहे.

शरद पवार यांचा शेतकऱ्यांना सर्व बंधनातून मुक्त करणाऱ्या सर्व गोष्टींना आणि विधेयकांना पाठिंबा राहिला आहे आणि पुढेही तो मिळेल, असं सूचक आवाहनही पाटलांनी केलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या 80 वा जन्मदिनानिमित्त त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पवारांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


थोडक्यात बातम्या-

“…तर 2014 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाला पाहावा लगला नसता”

धक्कादायक! ‘द डर्टी पिक्चर’ मधील अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

जय जवान, जय किसान; वाढदिवसाच्यानिमित्त युवराज सिंगचं चाहत्यांना ‘खास’ आवाहन

आप्पा, तुम्ही अजूनहीआमच्यातच आहात, धनंजय मुंडेंनी गोपीनाथ काकांना केलं अभिवादन

रेमो डिसुझाच्या प्रकृतीबाबत मित्राने दिले अपडेट्स, म्हणाला…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या