बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्व अफवा फेटाळून लावत किम जोंग उनची दणक्यात एण्ट्री; सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल

प्योंग्यांग | उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने सर्व अफवा फेटाळून लावत दणक्यात एण्ट्री केल्याचं पहायला मिळत आहे. तीन आठवडे गायब असलेल्या किम जोंग उनने सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. किम जोंग उन तीन आठवडे सार्वजनिक कार्यक्रमात दिसला नव्हता.

किम जोंग उनच्या प्रकृतीवरुन अनेक उलटसुटल चर्चा सुरु होती. या सर्व पार्श्वभूमीवर किम जोंगने आज एका खताच्या कारखानाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. उत्तर कोरियाची सरकारी न्यूज एजन्सी केसीएनएने याबाबतचं वृत्त दिलं. आहे. तसेच किम जोंग उनचा या कार्यक्रमातील एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

किम जोंग उन यापूर्वी 12 एप्रिललाला सार्वजनिक कार्यक्रमात दिसला होता. त्यानंतर तो दिसलाच नाही. त्यानंतर किमवर 12 एप्रिल रोजीच हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया झाल्याचं वृत्त समोर आलं होतं.

दरम्यान, किमने खत कंपनीचं उद्धाटन करुन उपस्थित जनतेला हात दाखवून अभिवादन केलं. यावेळी नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

इरफान गेला पण कुटुंबाची सोय करून गेला; कुटुंबियांसाठी ठेवली इतक्या कोटींची संपत्ती!

लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलात?, गावी जायचंय, दुसऱ्या राज्यात जायचंय?… वाचा काय आहे प्रक्रिया?

महत्वाच्या बातम्या-

आपलं अपयश झाकण्यासाठी छात्या बडवण्याचा कार्यक्रम सुरु- देवेंद्र फडणवीस

‘मी काही गमावलं नाहीये…’; इरफान खानच्या पत्नीची काळजाला भिडणारी पोस्ट

“100 टक्के लोकसंख्येला मोफत कॅशलेस विमा संरक्षण देणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More