नवी दिल्ली | मुकेश अंबानी यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान आता गमावला आहे. मपगमध्ये वॉटर किंग प्रसिद्ध असणाऱ्या झोंग शानशान यांनी मुकेश अंबानी यांचा हा मान हिसकावून घेतला आहे.
पत्रकारिता, मशरुमची शेती आणि आरोग्य सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणारे झोंग शानशान हे आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.
झोंग शानशान यांनी एप्रिल महिन्यात लस विकसित करणारी बीजिंग वंटाई बायोलॉजिकल फार्मसी एन्टरप्राईज ही कंपनी विकत घेतली होती. त्यानंतर महिनाभरात झोंग यांनी बाटलीबंद पाण्याची निर्मिती करणारी नोंगफू स्प्रिंग ही कंपनी विकत घेतली.
झोंग यांची संपत्ती 70.9 अब्ज डॉलर्सवरून वाढून 77.8 बिलियन डॉलर्स इतकी झाली आहे. झोंग शानशान यांच्या एकूण संपत्तीचे मूल्य पाहता जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा 11 वा क्रमांक लागतो.
थोडक्यात बातम्या-
गुड न्यूज! नव्या वर्षात आरोग्य अन् ग्रामविकास विभागात इतक्या हजार पदांची भरती
कोरोनानंतर फार मोठा बदल होईल असं मला वाटत नाही- प्रकाश आंबेडकर
“आमच्या फायद्यासाठी कायदे आणलेत म्हणता, मग ते मागे घेतल्याने कुणाचं नुकसान होणार आहे?”
कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर …- उद्धव ठाकरे
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून 17 नंबरचा अर्ज भरता येणार!