Top News खेळ देश

आयपीएलच्या लिलावाआधी मोठी घोषणा, ‘या’ सघानं घेतला नाव बदलण्याचा निर्णय!

Photo Courtesy- Facebook/IPL

मुंबई | दरवर्षी आयपीएलमध्ये काहीना काही बदल होत असतात. आयपीएलच्या आगामी सत्रासाठी अनेक खेळाडूंचा लिलाव येत्या 18 फेब्रुवारीला होणार आहे. मात्र या लिलावाआधी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. आयपीएलमध्ये सहभागी एका संघाने चक्क आपल्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील वर्षी आपल्या चमकदार कामगिरीमुळे सर्वांना प्रभावीत करणारा ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ संघ आता आपले नाव बदलत आहे. आयपीएलच्या आगामी 14 व्या सत्रात या संघाचं नवीन नाव ‘पंजाब किंग्स’ असेल. आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून किंग्ज इलेव्हन पंजाब खेळत असला तरी संघाला एकदाही आयपीएलची फायनल जिंकता आलेली नाही.

पंजाब किंग्सला के.एल.राहुल सारखा कुल कर्णधार लाभला आहे. त्या व्यतिरिक्त मयंक आग्रवाल, करून नायर, ख्रिस जाॅर्डन यांच्या सोबत युनिवर्सल बाॅस ख्रिस गेल यासारख्या खेळाडूंची त्यांच्याकडे रेलचेल आहे.  तर अनिल कुंबळेसारखे अनुभवी कोच पंजाब किंग्सला लाभले आहेत. याशिवाय आयपीएल लिलावात बोली लावण्यासाठी पंजाब किंग्सकडे सर्वाधिक पैसे आहेत, त्यामुळे या वर्षी पंजाब किंग्स एक तगडी टीम म्हणून समोर येऊ शकते.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोडांकडून मंत्रिपदाचा राजीनामा?

प्यार किया तो डरना क्या?, ‘त्या’ दोघींनी त्याची चक्क वाटणी करुन घेतली

पंढरपुरात काय वाजतं गाजतं, सोन्याचं बाशिंग… लगीन देवाचं लागतं… पाहा व्हिडीओ

टूलकिट प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन; बीडमधला संशयित फरार!

भारतीयांना जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअमवर दिवस-रात्र क्रिकेट सामना पाहण्याची संधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या