किरण भगतने घेतली महाराष्ट्र केसरीतून माघार

मुंबई | पैलवान किरण भगत यानं पाठदुखी आणि कंबरदुखी बळावल्यानं महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून माघार घेतली आहे. या वर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जालन्यात 19 ते 23 डिसेंबर या दरम्यान होणार आहे.

पाठदुखी आणि कंबरदुखीतून बरं होण्यासाठी डॉक्टरांनी किरणला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. किरण भगत यानं माघार घेतल्यामुळं त्याच्या चाहत्यांना किरणची कुस्ती पहायला मिळणार नाही.

किरण भगतनं महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून माघार घेतल्याच्या बातमीची वस्ताद काका पवार यांनी पुष्टी केली आहे. 

दरम्यान, मागील वर्षी किरण भगत महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता ठरला होता.

महत्वाच्या बातम्या-

-…या कारणानं नितीन गडकरींना आली चक्कर !

-मिकाला अटक झाल्याने राखीला रडू कोसळलं; सोडवायला दुबईला जाणार

-‘आंबा’ प्रकरणात संभाजी भिडेंना दिलासा; 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

-लाडक्या मुख्यमंत्र्यांना मोदींनी दाखवला अंगठा; पत्रातील मागणी फेटाळली

-मलबार हिलचं नाव बदलण्याची शिवसेनेची मागणी, हे नाव सुचवलं!