बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ड्रग्ज प्रकरणात नवा ट्विस्ट; भाजप नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई | अल्पसंख्याक मंंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. त्यावर अनेक भाजप नेत्यांनी समीर वानखेडेंना समर्थन देत नवाब मलिकांचे आरोप खोडून काढले होते. मात्र आता भाजप नेते मोहित भारतीय यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मोहित भारतीय यांनी नवाब मलिकांवर आरोप करत या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंंड सुनील पाटील असल्याचं म्हटलं आहे. सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा काँग्रेसचा सदस्य असून तो अनिल देशमुखांचा मुलगा ह्र्षिकेष देशमुख याचा मित्र असल्याचाही दावा मोहीत भारतीय यांनी केला आहे. शिवाय क्रुझ ड्रग पार्टीबाबत सुनिल पाटील आणि सॅम डिसूजा यांच्यात सवांद झाला होता, असंही ते म्हणाले आहेत.

याशिवाय किरण गोसावी हा नवाब मलिकांचाचा माणूस असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. ते म्हणाले, किरण गोसावीचा नंबर सुनिल पाटीलनेच सॅम डिसूजाला दिला होता. सुनिल पाटीलच्या सांगण्यावरूनच किरण गोसावीला व्हि. व्हि. सिंग या अधिकाऱ्याला भेटवलं असल्याचे मोहित भारतीयांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

असे अनेक गंभीर आरोप करून मोहित भारतीय यांनी सुनिल पाटीलला पुढे करून राज्य सरकारच्या मंत्र्यांनी एनसीबीविरूद्ध षडंयत्र रचलं असल्याची टीका केली आहे. शिवाय सुनील पाटील याच्यासोबत नवाब मलिक यांचे काय संबंध आहेत? या प्रश्नाची उत्तर राज्य सरकारच्या मंत्र्यानी द्यायला हवीत, असा प्रहार मोहीत भारतीय यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी मलिकांची पोलखोल करणार, त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही”

‘सबसे अलग हूं, पर गलत नही’ म्हणत संजय राऊतांचं नारायण राणेंना प्रत्युत्तर

…तर 30 नोव्हेंबरनंतर तुम्हाला मोफत रेशन मिळणार नाही!

” महाविकास आघाडीतील 3 मंत्र्याचे घोटाळे उघडकीस आणणार”

‘या’ देशाची चिंता वाढली; गेल्या 24 तासातील कोरोना रूग्णांची संख्या धडकी भरवणारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More