बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किरण माने प्रकरण: “महिलांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून काढलं”

मुंबई | सध्या राज्यात किरण माने प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. अभिनेते किरण माने त्यांच्या राजकीय वक्तव्यामुळे अडचणींत सापडले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ पहायला मिळाली.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत अभिनेते किरण माने भूमिका साकारत आहे. मात्र आता त्यांना या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. किरण माने घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आलं आहे. अशातच आता मालिकेतील काढण्यावरुन राजकारण तापलं असताना स्टार प्रवाहने याविषयी पत्रक जारी केलं आहे.

जारी केलेल्या पत्रकामध्ये वाहिनीने म्हटलं की, किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः मालिकेतील महिला कलाकारांशी केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

वाहिनीने निवेदनात पुढे म्हटलं की, इतकंच नव्हे तर इतर कर्मचाऱ्यांनी देखील त्यांच्या वागणुकीबद्दल तक्रारी केल्या होत्या. माने यांना वारंवार बजावून देखील या गोष्टी सतत घडत राहिल्या, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता किरण माने वातावरण चांगलंच तापलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

Omicron मधून बरं झाल्यानंतर शरिरात ‘इतका’ कालावधी अँटीबॉडीज राहतात, तज्ज्ञांचा इशारा

ऑनलाईन पिझ्झा मागवणं पडलं महागात, महिलेला बसला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा गंडा

‘या’ ठिकाणी मास्क घालण्यात हलगर्जीपणा, पोलिसांनी आकारला तब्बल एवढा दंड

चिंताजनक! कोरोना रुग्णसंख्येत वाढ, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

धक्कादायक! ‘इतक्या’ वेळा होऊ शकते ओमिक्राॅनची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More