Kiran Mane | बारामती लोकसभा मतदारसंघ आणि सातारा लोकसभा मतदारसंघात नुकतंच मतदान पार पडलं. बारामती लोकसभा मतदारसंंघात केवळ राज्य नाहीतर देशाचं लक्ष लागलं होतं. मात्र या मतदारसंघात ईव्हीएमचे जे काही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते बंद होते असा दावा अभिनेते किरण मानेंनी केलाय. याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली जात आहे. यावर आता अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.
ईव्हीएम प्रकरणाबाबत मोठी खळबळ
घडलेल्या या प्रकारावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे लक्ष्मीकांत खाबिया यांनी आक्षेप घेतला. सकाळपासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आलीये. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं नेमकं कारण काय आहे हे माहिती असणं गरजेचं असल्याचं खाबिया यांनी म्हटलं आहे. काही कार्यकर्ते उभे आहेत. मात्र त्यांना गोडाऊन दाखवलं जात नसल्याचा दावा खाबिया यांनी केला आहे. (Kiran Mane)
दरम्यान साताऱ्यामध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. गोदामामध्ये ईव्हीएम मशीन ठेवले असून गोदामात सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील साताऱ्यातील सरचिटणीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. (Kiran Mane)
10 मे पासून सीसीटीव्हीचं कव्हरेज बंद असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर योग्य दखल घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना देण्याचं काम करण्यात येत आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेते किरण माने यांनी याबाबत आपल्या फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी बारामती आणि साताऱ्यातील ईव्हीएम असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बंद केल्याबाबत प्रश्न केला आहे.
किरण मानेंची काय होती पोस्ट?
किरण माने (Kiran Mane) हे अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असतात. सध्या त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत. त्यांनी आता ईव्हीएम मशीनबाबत चिंता व्यक्त केली आहे. “काल सातार्यात आणि आज बारामतीत जिथे EVM मशिन्स ठेवल्या आहेत, त्या स्ट्राँग रूममधले सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले होते, ही बातमी खरी आहे का?,” अशी पोस्ट करत त्यांनी उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे.
News Title – Kiran Mane EVM Machine Viral Post
महत्त्वाच्या बातम्या
“धर्मावरून पाकिस्तानला इस्लामिक राष्ट्र बनवलं मग भारताला हिंदू..”; कंगनाचं मोठं वक्तव्य
बजरंग सोनवणेंचा धक्कादायक दावा; बीडमध्ये एकच खळबळ
आहारात प्रोटीन पावडरचा समावेश करताय? तर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
मतदान करायला घराबाहेर पडण्याअगोदर ही बातमी वाचाच! अन्यथा थांबावा लागेल तासनतास रोडवर उभा