“प्रचंड असह्य वेदना..”; किरण माने आयसीयूमध्ये दाखल

Kiran Mane | अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने हे विविध विषयांवर आपली मते मांडत असतात. ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ते राजकीय विषयांवर देखील रोखठोक भाष्य करत असतात. किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायमच चर्चेत राहत असतात. अशात त्यांची ( Kiran Mane )एक पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे.

किरण माने यांना प्रकृती बरी नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मी आयसीयूत आहे असं किरण मानेंनी फेसबुक पोस्ट करत सांगितलं आहे. या पोस्टनंतर चिंता व्यक्त केली जात आहे.

आपण आयसीयूत दाखल झालो आहोत, असं किरण माने ( Kiran Mane ) यांनी पोस्ट करुन सांगितलं आहे. किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर ही पोस्ट केली आहे. त्यात काळजी करु नका असं, देखील ते म्हणाले आहेत. या पोस्टवर त्यांचे हितचिंतक काळजी घ्या, अशा कमेन्ट करत आहेत.

किरण माने यांची पोस्ट काय?

“काल दुपारपर्यंत फिट, तंदुरुस्त, हसत खेळत होतो. आज आय.सी.यू, सलाईन, इंजेक्शन, गोळ्या तपासण्या आणि प्रचंड असह्य वेदना. आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं! अर्थात, यावरही मात करून यातून बाहेर पडेन. फिकीर नॉट.”, अशी पोस्ट किरण माने ( Kiran Mane )यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना काळजी घेण्यास सांगितलंय.

किरण माने

किरण माने आयसीयूमध्ये दाखल

या पोस्टवर एक नेटकरी म्हणाला, ‘काळजी घ्या आमच्या सदभावना आपल्या सोबत आहेत दादा…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘काळजी घ्या दादा.. काय झालंय, लवकर बरे व्हा…’ अनेकांनी कमेंट करत किरण माने यांच्या प्रकृतीची विचारणा केली आहे.

दरम्यान, आयसीयूमध्ये दाखल होण्याआधी किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये ते म्हणाले, ‘सिंपथी मिळवणं सोपं असतं. कोणाही दुबळ्या, हतबल माणसाला ती सहज मिळते. जेलसी लय कष्टाने कमवावी लागते, संघर्ष करुन यश मिळवणाऱ्या जिगरबाजालाच ती लाभते…’ असे किरण माने( Kiran Mane ) म्हणाले होते.

News Title-  kiran mane hospitalized he is in the icu

महत्वाच्या बातम्या :

पवित्र श्रावणात ‘या’ ज्योतिर्लिंगांचं घ्या दर्शन; IRCTC चे टूर पॅकेज एकदा बघाच

Paris Olympics मध्ये भारताच्या खात्यात दुसरं पदक; नेमबाजीत ‘या’ जोडीने रचला इतिहास

राज ठाकरेंना ‘सुपारीबाज’ म्हणणाऱ्या अमोल मिटकरींवर मनसैनिकांकडून हल्ला; अकोल्यात प्रचंड गोंधळ

“…तर उद्या एखादा दहशतवादीही नाव बदलून भेटायला येईल”; सुप्रिया सुळे संतापल्या

“चित्रा वाघ यांचे कारनामे माझ्या पेनड्राईव्हमध्ये, सगळं उघड..”; ‘या’ महिला नेत्याचा थेट इशारा