“…ताई आज अचानक हिंदू कशी झाली?”, केतकी चितळेच्या वक्तव्याचा किरण मानेंनी घेतला समाचार

Kiran Mane

Kiran Mane | केतकी चितळे ही तिच्या वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असते. तिने केलेल्या वक्तव्याची अनेकदा चर्चा होताना दिसत असते. केतकीने एका व्हिडीओतून महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. तिने सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे हल्लाबोल केला आहे. राज्यातील महायुती सरकारने वक्फ बोर्डाला 10 कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. केतकी चितळेने एक व्हिडीओ जारी केला आहे. ज्यांनी मत दिलं नाही त्यांना 10 कोटी दिले. तुम्ही बधीर झाला का?, असा सवाल तिने सरकारला केला आहे. त्यावर आता किरण मानेंनी (Kiran Mane) पोस्ट करत केतकीचा खरपूस समाचार घेतला.

देशात मोर्चे काढले जात असून वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी होत आहे. पण तुम्ही वक्फ बोर्डला 10 कोटी दिले आहेत. तुम्हाला आता हिंदू देखील नकोय का, हे ठरवलं आहे का?, असा सवालही केतकी चितळेने केलाय. यावर आता मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी केतकी चितळेनं केलेल्या वक्तव्यावर टोला लगावला आहे.

दरम्यान, मध्यंतरी मराठा आरक्षणासाठी महानगरपालिकेच्या कर्मचारी मराठा समाजासाठी सर्व्हे करत होत्या. त्यावेळी महानगरपालिकेच्या महिला कर्मचारी यांनी केतकीला तिची जात विचारली होती. तेव्हा केतकीने महानगरपालिकेच्या महिला कर्मचारी यांना जात विचारली तेव्हा महिला कर्मचारी यांनी जात सांगितली. त्यावर केतकी चितळेने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ आहे, असं उत्तर दिलं होतं. यावरून किरण मानेंनी केतकीला सुनावलंय.

किरण मानेंची पोस्ट चर्चेत

“ताईच्या दारात महानगरपालिकेची कर्मचारी भगिनी गेली होती, तेव्हा ताईने तिला जात विचारली होती. ती “मराठा” म्हणाल्यावर तिला तुच्छतेने हिणवताना ताई म्हणाली, “मी ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ आहे”….
मग ताई आज अचानक ‘हिंदु’ कशी झाली???”, अशी फेसबुक पोस्ट किरण मानेंनी (Kiran Mane) केली.

नेमकी काय म्हणाली होती केतकी चितळे?

काही महिन्यांआधी केतकी चितळेने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये केतकी चितळेनं मराठा आरक्षणासाठी सर्व्हे करण्यासाठी आलेल्या महानगरपालिकेच्या एका महिलेला ती सवाल करत होती. एका महिला कर्मचारी यांनी केतकीला विचारले की, तुम्ही महानगरपालिकेतून आलाता? तुम्ही जात विचारत आहात ना? आरक्षण म्हणून ओपन…का? केतकीच्या प्रश्नावर उत्तर दिलं की, संबंधित सर्व्हे हा मराठा आरक्षणासाठी सुरू आहे. त्यावर अभिनेत्री म्हणते की आज गणतंत्र दिवस आहे. तुम्हीपण मराठा म्हणजे अॅट्रॉसिटी टाकणार नाहीत, धन्यवाद मॅडम!

यानंतर केतकी महिला विचारते की, तुम्ही मराठा आहात का? या प्रश्नावर उत्तर देताना केतकी म्हणाली की, ‘अजिबात नाही, मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे’, असं केतकी चितळे म्हणाली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

 

News Title – Kiran Mane Post On Ketaki Chitale ABout Hinduism

महत्त्वाच्या बातम्या

“अजित पवारांची जागा रोहित पवारांना घ्यायचीये, पण जयंत पाटील ठरतायेत अडचण”

ऐश्वर्या रायच्या अनेक गोष्टी पटत नाहीत, चारचौघात जया बच्चन मनातलं बोलून गेल्या!

जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; त्वचेवरही होतात वाईट परिणाम

पुण्यात पुन्हा हिट अँड रन! भरधाव कारने महिलेला उडवलं,24 तासांनंतरही गुन्हा दाखल नाही

सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी; नाराज छगन भुजबळ म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .