Kiran Mane | देशाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं होतं. महाविकास आघाडी ही महायुतीवर भारी पडल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान साताऱ्याची जागा वगळता इतर जागांवर शरदचंद्र पवार गटाने बाजी मारली आहे. तर ठाकरे गटाने देखील आगेकुच केली असल्याचं पाहायला मिळालं आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. (Kiran Mane)
महायुतीला यंदा केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवता आला असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीचे पारडं जड असल्याचं चित्र राज्याच्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालं आहे.
निकालाआधी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी एक वक्तव्य केलं होतं. शेलार म्हणाले होते की, महाविकास आघाडीने केवळ 18 जागा निवडून आणाव्या मी राजकारण सोडून देईल, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं होतं.
आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण किरण माने (Kiran Mane) यांनी करून दिली. किरण मानेंनी व्हिडीओ शेअर करत शेलारांना डिवचलं आहे.
काय म्हणाले होते आशिष शेलार?
उद्धव ठाकरे यांना माझं जाहीर आवाहन आहे की, जर लोकसभेत भारतीय जनता पक्षाने 45 वर जागा मिळवल्या तर तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो की, देशात जाऊद्या, महाराष्ट्रात तुम्ही गेल्यावेळी आमच्यासोबत होता. म्हणून 18 जागा निवडून आल्या होत्या. आता तुम्ही महाविकास आघाडीतून 18 जागांवर आला तरीही मी राजकारण सोडून देईल असं आशिष शेलार म्हणाले होते. आता आशिष शेलार यांच्या व्हिडीओवर किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुकवर पोस्ट करत खरा मर्द दिलेला शब्द पाळतो, असं म्हटलं आहे.
काय म्हणाले किरण माने?
खरा मर्द दिलेला शब्द पाळतो. आशिषजी तुम्ही तो पाळणार याची खात्री आहे !, अशी पोस्ट करत किरण माने (Kiran Mane) यांनी आशिष शेलार यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
News Title – Kiran Mane Share Viral Post Of Ashish Shelar Statement About Mahavikas Aghadi
महत्त्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदेंचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?
घरच्या आमदारानं केला शशिकांत शिंदेंचा घात, अशी पडली साताऱ्यात जागा!
दारुण पराभवानंतर राजू शेट्टी यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टनं खळबळ
संविधान वाचवण्यासाठी ‘या’ नेत्यांनी एकत्रित यावे; बड्या नेत्याचं विधान
महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल वाचा एकाच ठिकाणी