‘सुंदर स्त्री आपल्यापेक्षा हीन जातीतली असली तरी…’; किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Kiran Mane | मनुस्मृतीवरून राज्यातील वातावरण तापलं आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याबाबत निर्णय घेतला. मात्र आता राज्यातून याला कडाडून विरोध होताना दिसत आहे.

मनुस्मृतीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच आता अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी मनुस्मृतीवरून एक पोस्ट केली आहे. सध्या ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 किरण मानेंची पोस्ट चर्चेत

पोस्टमध्ये किरण माने यांनी मनुस्मृतीच्या श्लोकांचं वर्णन केलं आहे. मनुस्मृतीच्या श्लोकांमध्ये महिलांना खालच्या पातळीत उद्देशून लिहिण्यात आलं आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये श्लोकांचा अर्थ देखील सांगितला आहे.

त्यांनी म्हटलं की, मनुस्मृतीची शिकवण द्यायची की शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांनी त्यांना समृद्ध करायचे ते पाहावे. किरण मानेंच्या (Kiran Mane) पोस्टला अनेकांनी समर्थन दिलं आहे. (Kiran Mane

‘मनुस्मृती’ लिहीनारं मनू भृगू का कोन बांडगुळ हाय ते लै अवलादी असणार यात शंका नाही… आजकाल एक नग हाय बघा…जो काल एक बोलतो आणि आज बरोब्बर त्याच्या विरूद्ध बोलतो… आन् उद्या तिसरंच कायतरी बरळतो ! तसंच ते मनुस्मृती लिहीनारं किरानीष्ट बोड्याचं बेनं असनारंय, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

परवा एका भगिनीनं मनुस्मृतीतला एक श्लोक ऐकवला ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता’ ! जिथं स्त्रियांची पूजा होते तिथं देवताही रमतात. ती पुढं म्हन्ली, “इतका मान स्त्रियांना दिलाय मनुस्मृतीत. तुम्ही जातीयवादी आहात म्हणून तुम्हाला कळत नाहीये.” व्हाॅटस् ॲप युनिव्हर्सिटीचा हा कचरा बघुन मी कपाळावर हात मारून घेतला, असं किरण मानेंनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुणे अपघातप्रकरणी मोठी माहिती समोर, त्या रात्री विशाल अग्रवाल यांनी सुनील टिंगरेंना…

शाहरुख खान ‘या’ गोष्टीत कधीही यशस्वी होणार नाही; गौतम गंभीर असं का म्हणाला?

महायुतीत वादाची ठिणगी?, भुजबळ पुन्हा कडाडले

इम्तियाज जलिल यांनी घेतली जितेंद्र आव्हाडांची बाजू, म्हणाले…

पुण्यात पब आणि बारचालकांना दणका; कठोर नियम लागू होणार?