“लग्नापूर्वी वर्षभर..”, आमिर खानच्या एक्स पत्नीचा धक्कादायक खुलासा

Kiran Rao | अभिनेता आमिर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी 16 वर्षे संसार करत घटस्फोट घेतला. मात्र त्यांच्यात अजूनही प्रेमळ नाते संबंध दिसून येतात. काही महिन्यांपूर्वीच आमिर (Aamir Khan) आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आयरा खान हीचा नूपुर शिखरे सोबत विवाह झाला. या विवाह सोहळ्यात किरण प्रत्येक कार्यक्रमात हजर होती.

किरणने आयरासाठी एका आईची भूमिका उत्तम बजावली. या लग्नातच आमिर आणि किरणचा चांगला बॉन्डही दिसून आला होता. यानंतर दोघे ‘लापता लेडीज’ या चित्रपटामुळे चर्चेत आले. किरण राव (Kiran Rao) आणि आमिर खानने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.

किरण रावचा मोठा खुलासा

अशात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये किरण रावने आमिर आणि तिच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केलाय.मुलाखतीत किरणने सांगितलं की लग्नापूर्वी ती आमिरसोबत वर्षभर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्यानंतर केवळ आईवडिलांच्या दबावामुळे आम्ही लग्न केलं, असल्याचं ती म्हणाली.

किरणने विवाह संस्थेबाबत आपलं मत मांडलं. “लग्न ही खूपच सुंदर संस्था आहे, पण यामध्ये अनेकदा महिलेकडून बऱ्याच अपेक्षा केल्या जातात. घर आणि पतीच्या कुटुंबीयांसोबतच्या सर्व नाती सांभाळण्याचा भार महिलांवर अधिक असतो”, असं यावेळी किरण म्हणाली.

“जोडीदार म्हणून व्यवस्थित..”

“लग्न करण्यापूर्वी म्हणजेच एक वर्षापूर्वी मी आणि आमिर दोघेही वर्ष लिव्ह इनमध्ये राहत होतो. पण, खरं सांगायचं झालं तर, आम्ही आमच्या पालकांमुळे लग्न केलं. वैवाहिक आयुष्यात तुम्ही वैयक्तिक आणि जोडीदार म्हणून व्यवस्थित राहू शकलात, तर लग्न ही संस्था खूप सुंदर आहे. माझ्या मते तुम्ही लग्नाचा अर्थ ज्या पद्धतीने मांडता, ते अधिक महत्त्वाचं आहे.”, असा खुलासा किरण रावने केला.

दरम्यान, लगान या चित्रपटाच्या वेळी आमिर आणि किरण यांच्यात प्रेम जडलं होतं. ‘लगान’ या चित्रपटात किरणने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलं होतं. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, या काळात आमिर खानचं रिना दत्ताशी लग्न झालं होतं.तेव्हा किरणमुळे (Kiran Rao) आमिरने रिनाला घटस्फोट दिला, अशा चर्चा झाल्या होत्या. सध्या आमिर आणि किरण दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले आहेत.

News Title- Kiran Rao big revelation about Aamir Khan

महत्त्वाच्या बातम्या –

दिनेश कार्तिकच्या पहिल्या बायकोने केले ‘या’ क्रिकेटरसोबत लग्न! जाणून घ्या इन साईड आणि आऊट साईड स्टोरी

‘या’ शहरांना पेट्रोल दरवाढीचा झटका; जाणून घ्या आजचे इंधनदर

शाहरुख खानवर अजूनही उपचार सुरू?; हेल्थबद्दल मोठी अपडेट समोर

बाहेर पडताना काळजी घ्या; ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

शरद पवारांना लागली बारामतीमधील विजयाची चाहुल; केलं मोठं वक्तव्य