Kiran Rao | अभिनेता आमिर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी 16 वर्षे संसार करत घटस्फोट घेतला. मात्र त्यांच्यात अजूनही प्रेमळ नाते संबंध दिसून येतात. काही महिन्यांपूर्वीच आमिर (Aamir Khan) आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आयरा खान हीचा नूपुर शिखरे सोबत विवाह झाला. या विवाह सोहळ्यात किरण (Kiran Rao)प्रत्येक कार्यक्रमात हजर होती.
या लग्नातच आमिर आणि किरणचा चांगला बॉन्डही दिसून आला होता. यानंतर दोघे ‘लापता लेडीज’ या चित्रपटामुळे चर्चेत आले. किरण राव (Kiran Rao) आणि आमिर खानने या चित्रपटाची निर्मिती केली होती. अशात किरण रावने घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
किरण रावचं मोठं वक्तव्य
आमिर आणि किरण यांनी 2021 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही ते दोघे एकत्र फिरताना, काम करताना दिसतात. दोघेही अनेकदा कुटुंब आणि मुलासोबत वेळ व्यतीत करत असतात. अशात किरणने तिच्या घटस्फोटानंतरच्या आयुष्याबाबत मोठं भाष्य केलं आहे.
एका कार्यक्रमात किरण रावने अनेक गोष्टींवर आपले मत मांडले. खासगी आयुष्यापासून ते व्यावसायिक गोष्टींवर देखील तिने मनसोक्त गप्पा मारल्या. “मला असं वाटतं की वेळोवेळी तुम्हाला तुमचं नातं पुन्हा नव्याने जागं करण्याची गरज असते. कारण जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे माणूस म्हणून आपण खूप बदलत जातो.घटस्फोटानंतर मी खूप आनंदी आहे असे मला वाटते. याला तुम्ही आनंदी घटस्फोट म्हणू शकता.”, असं किरण राव(Kiran Rao) म्हणाली आहे. तिचं हे विधान आता चर्चेत आलं आहे.
“..याला तुम्ही आनंदी घटस्फोट म्हणू शकता”
पुढे ती म्हणाली की, “मी लग्नापुर्वी बराच काळ सिंगल होती. मी माझं आयुष्य आणि स्वातंत्र्य पूर्णपणे एन्जॉय केलं. तेव्हा मला एकटेपणा वाटायचा, पण आता नाही. कारण मी माझा मुलगा आझाद सोबत आहे. घटस्फोटानंतर बहुतेक लोकांना एकटेपणा जाणवतो, परंतु मला ते कधीच जाणवले नाही. मला आमिर पूर्ण पाठिंबा देतो.”
दरम्यान, ‘लगान’ या चित्रपटाच्या वेळी आमिर आणि किरण यांच्यात प्रेम जडलं होतं. ‘लगान’ या चित्रपटात किरणने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलं होतं. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, या काळात आमिर खानचं रिना दत्ताशी लग्न झालं होतं. तेव्हा किरणमुळे (Kiran Rao) आमिरने रिनाला घटस्फोट दिला, अशा चर्चा झाल्या होत्या. सध्या आमिर आणि किरण दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले आहेत.
News Title- Kiran Rao Big Statement About Divorce
महत्त्वाच्या बातम्या –
सोनाक्षी सिन्हाने लग्नाच्या एकच महिन्यांनी दिली गुड न्यूज?, ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल
अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाले..
“पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यात भांडण झालंय, त्यांनी..”; संजय राऊत यांची टीका
राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊस, NDRF ची टीम तैनात
राज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक ठिकाणी शाळांना सुट्ट्या, ‘या’ भागांना आज हायअलर्ट