फेसबुकवर 11 लाख फॉलोवर्स असणाऱ्या महिलेचे मोदींवर गंभीर आरोप

पाटणा | मोदींनी माझ्या पतीला कोणतंही कारण न देता सैन्यातून काढलं, असा आरोप किरण यादवनं केला आहे. किरण यादव फेसबुक सेलिब्रेटी आहे. तिला फेसबुकवर तब्बल 11 लाख 20 हजार लोक फॉलो करत आहेत. 

किरण यादवने फेसबुकवर सातत्याने मोदी सरकारच्या निर्णयांवर टीका करत आली आहे. राजकीय नेता किंवा सेलिब्रेटी नसतानाही लोकांनी तिला डोक्यावर घेतलं. मात्र याच मोदीविरोधी पोस्टमुळे आपल्या पतीला सैन्यातून काढून टाकण्यात आलंय, असं किरण यादवनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

मी कोणत्या पार्टीची दलाल नाही, असते तर आतापर्यंत हंगामा झाला असता त्यामुळे तुम्ही माझी साथ द्या, असं आवाहन तीनं नागरिकांना केलंय.

दरम्यान, किरण यादव यापूर्वीही आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे बातम्यांचा विषय राहिली आहे. हे फेक अकाऊंट असल्याचा काहींचा अंदाज होता, मात्र तिचा पती हे अकाऊंट सांभाळत असावा, असा काहींना संशय आहे.