महाराष्ट्र मुंबई

‘मुंबईच्या महापौरांनी SRA सोसायटीतील फ्लॅट बळकावला’; भाजपचा गंभीर आरोप

मुंबई | कंगणा राणावत आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेला वाद आता कुठे शांत झाला असल्याचं दिसत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं की, कंगणाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नसून जे काही आहे ते महापालिकेला विचारावं. मात्र अशातच भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महापौर किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केला आहे.

वरळीतील गोमाता एसआरए सोसायटीच्या इमारत क्रमांक 2 मधील रहिवासी फ्लॅट आणि इमारत क्रमांक 1 मधील कार्यालय (केआयएस कॉर्पोरेशन सर्व्हिसेस) हे महापौर किशोरी पेडणेकर यांनी बळकावलं आहे.  यासंदर्भात त्यांनी ट्विट करत गंभीर आरोप केला आहे.

तो फ्लॅट झोपडपट्टी पुनर्वसनाखाली एका व्यक्तीला आणि ऑफिस हे गोमाता एसआरए हाऊसिंग सोसायटीला देण्यात आलं होतं. आता प्रकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येतो, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याआधीही किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांवर आरोप केले होते. मात्र त्यावेळी पेडणेकरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत पुरावे सादर करा मी राजीनामा देते असं म्हटलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या-

एनसीबीच्या चौकशीत रियाने ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींची घेतली नावं

देवेंद्र फडणवीसांवर खडसेंनी केलेल्या टीकेला अमृता फडणवीसाचं उत्तर, म्हणाल्या…

गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचं निधन

21 सप्टेंबर नव्हे आता ‘या’ दिवसापासून शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

…तर पुढच्या बैठकीला काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या