बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी वानखेडे कुटुंबीयांची माफी मागतो, ठाकरे सरकारच्या…”

मुंबई | मुंबईतील कथित ड्रग्स प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरची माफी मागितली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसारच नवाब मलिक समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांवर चिखलफेक करत आहेत, असा थेट आरोप किरीट सोमय्या यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. यासाठी सर्व महाराष्ट्र तुमची माफी मागत आहे, असं सोमय्यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्याशी मी बोलून माफी मागितली आहे. तसेच सर्व महाराष्ट्र त्यांची माफी मागत आहे. समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न, दुसरं लग्न आणि तु दलित का मुस्लिम आहे? ठाकरे सरकार समीर वानखेडेंचा बाप काढत आहेत. मी वानखेडे कुटुंबीयांची माफी मागतो, असं सोमय्या म्हणाले आहेत.

दरम्यान, 12 दिवसांआधी ठाकरे सरकारमधील एक मंत्री चिखल उडवतो. त्या क्रूझच्या पैश्यांचा व्यवहार झाला असेल तर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली आहे. शाहरूख खानने नकार दिल्यावर नवाब मलिक, शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करायला पाहिजे होतं. एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक आयुष्य खराब करून ते काय साध्य करू इच्छित आहेत? देवानी त्यांना माफ करावं, असं सोमय्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“दाऊद तर पाकिस्तानात आहे, मग तो इकडे कसा येऊ शकतो”

‘तुषार भोसले माफी मागा नाहीतर…’; ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक

‘एक बाप म्हणून मी खूप…’; आर्यन खानच्या जामिनानंतर आर. माधवनचं ट्विट

अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; दिवाळीआधी प्रवाशांना मोठा दिलासा

“मोहम्मद आमीरची इतकी औकात नाही की, मी त्याच्याबद्दल बोलावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More