बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ बड्या शिवसेना नेत्यासह विश्वास नांगरे पाटीलही किरीट सोमय्यांच्या रडारवर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका करत असताना पाहायला मिळत आहेत. त्यातच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. सोमय्यांनी आता जरंडेश्वर प्रमाणेच शिवसेना नेत्याने  एक घोटाळा केल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

जालन्याचे शिवसेना नेते व माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याप्रमाणेच घोटाळा केला असा आरोप किरीट सोमय्या यांनी करत या घोटाळ्यात विश्वास नांगरे पाटील, त्यांच्या पत्नी रुपाली नांगरे पाटील आणि सासरे पद्माकर मुळे यांंचीही नावं समोर आणली आहेत. किरीट सोमय्यांच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ माजली आहे.

‘जालना साखर कारखान्याचा घोटाळा मी बाहेर काढल्यानंतर त्या कारखान्याचा आणि माझा काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण अर्जून खोतकरांनी दिलं आहे. पण माझ्याकडे संपुर्ण कागदपत्रे असून जालना साखर कारखान्याचा मालक हा अर्जुन इंडस्ट्रीज आहे, आता त्याचा मालक कोण आहे?’, असा सवाल किरीट सोमय्यांनी विचारला आहे.

सीबीआय किंवा न्यायाधिशांच्या माध्यमातून या प्रकऱणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. तसेच हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्जुन खोतकर यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, असा घणाघातही सोमय्यांनी केला आहे. जरंडेश्वरमध्ये अजित पवारांनी जसा घोटाळा केला, तसाच घोटाळा खोतकरांनी केला असल्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केला आहे.

याप्रकरणात विश्वास नांगरे पाटील यांचं त्यांच्या पत्नीचं आणि सासऱ्यांचं नाव आल्याने अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर 2018 साली अर्जुन शुगर इंडस्ट्रीज नावाने खोतकरांनी सुरू केलेल्या कंपनीची चौकशी करण्यासाठी दिल्लीला सहकार मंत्रालयात जाणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या

देश कोरोनामुक्तीच्या वाटेवर, पहिल्यांदाच कोरोनामुक्तीच्या दराने गाठला उच्चांक

‘शांततापुर्ण वातावरणातील आंदोलन सरकार दडपत असेल तर…’, दरेकरांचा गंभीर इशारा

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नियुक्त्या जाहीर, ‘या’ चेहऱ्यांना मिळाली मोठी संधी

“कंगणासारख्या पद्मश्री घेणाऱ्या लोकांची मला लाज वाटते”

“…तरी महाराष्ट्रात शिवसेनेला आता कुत्रं भिक घालणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More