बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीच्या ‘या’ चार दिग्गज नेत्यांचे जावई किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर आरोपांची खैरात करत आहेत. सोमय्यांच्या आरोपामुळं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. किरीट सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बेकायदेशीरित्या संपत्ती जमवल्याचा आरोप केला आहे. त्यातच आता सोमय्यांनी मुश्रीफ यांच्यावर आणखी आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.

कोल्हापूरमधील संताजी घोरपडे साखर कारखान्याप्रमाणेच गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे या कारखान्यात बनावट बोगस कंपन्यामार्फत घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केला आहे. आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात मुश्रीफ यांचे जावई मतीन हसीन मंगोली यांचा सुद्धा या घोटाळ्यात सहभाग आहे, असा गंभीर आरोप सोमय्यांनी मुश्रीफ आणि त्यांचे जावई मंगोली यांच्यावर केला आहे.

किरीट सोमय्यांनी आतापर्यंत महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार दिग्गज मंत्र्यांवर आरोप तर केलेेच आहेत, पण चारही मंत्र्यांच्या जावयांच्या नावांचा समावेश झाला आहे. या आरोप झालेल्या मंत्र्यांमध्ये अनिल देशमुख आणि त्यांचे जावई गौरव चतुुर्वेदी, नवाब मलिक आणि त्यांचे जावई समीर खान, एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यासह हसन मुश्रीफ आणि त्यांचे जावई मतीन हसीन मंगोली या सर्व दिग्गज मंत्र्यांवर आणि त्यांच्या जावयांवर आरोप झाले आहे.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन हसीन मंगोली हे ब्रिक इंडिया या बेकायदेशीर कंपनीचे मालक आहेत. या सर्व बेकायदेशीर कंपन्यात शेअर्सची अफरातफर मुश्रीफ यांचे जावई मतीन हसीन मंगोली यांनी केली आहे. तसेच, हसन मुश्रीफ 2019 ला राज्याचे ग्रामविकास मंत्री झाल्यावर घोटाळा करून कमावलेला पैसा त्यांनी याच सर्व बनावट कंपन्याचा वापर करून वापरात आणला आहे, असं सोमय्या म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

सासू सासऱ्यांना आला सूनेवर संशय, नात्वाचा जन्म होताच केली DNA टेस्ट अन्…

देवेंद्र फडणवीस दबंग नेते, ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात- चंद्रकांत पाटील

ऐकावं ते नवलंच! रामदर्शनाला जाताना दोन्ही मुलींना गमावलं दोन वर्षांनी त्याच तारखेला….

“कोणालाही द्यायला आमचं ऑफर लेटर असंच मैदानात पडलेलं नाही”

लेकीच्या शाळेच्या व्हॅट्सअॅप ग्रुपवर वडिलांनी पाठवलं असं काही की…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More