बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“स्वत:चे घोटाळे दाबण्यासाठीच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची…”

मुंबई | आर्यन खानच्या अटकेपासून राजकीय वातावरणात रोज नवी खळबळ पाहायला मिळत आहे. क्रुझ कारवाईनंतर चर्चेत आलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले. मलिकांच्या आरोपानंतर वानखेडेंच्या अडचणीत वाढ झालेली दिसत आहे. अडचणीने घेरलेल्या वानखेडेंची पाठराखण करण्यासाठी आता भाजप नेते पुढे सरसावले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्यांनी वानखेडेंची पाठराखण करताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेले 12 दिवस समीर वानखेडे दलित आहेत की मुस्लिम यावर वाद सुरू आहे. पण खरा मुद्दा हा आर्यन खानचा आहे. एका अधिकाऱ्याच्या जातीवर बोललं जात आहे, त्याच्या बायकोची इज्जत काढली जाते, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लाज वाटली पाहिजे, अशी जहरी टीका सोमय्यांनी केली आहे.

किरीट सोमय्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ही सगळी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची ट्रीक आहे. अजित पवारांवर 11 दिवसांपासून धाडी सुरू होत्या. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ठाकरे सरकारची ही बदमाशी सुरू असल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनी केला आहे. स्वत:चे घोटाळे दाबण्यासाठी महाविकास आघाडी समीर वानखेडेंना अडचणीत आणत असल्याचं म्हणत सोमय्यांनी संताप व्यक्त केला आहे.

तर येत्या 31 डिसेंबरपर्यंत मी अलीबाबा आणि चाळीस चोरांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशाराही किरीट सोमय्यांनी दिला आहे.  दरम्यान, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनावर केलेल्या आरोपानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नवाब मलिकांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नसल्याचं म्हणत समीर वानखेेडेंनी सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

सिग्नलच्या देखभालीसाठी पुणे महानगरपालिका खर्च करणार तब्बल एवढे कोटी

“मोदी सरकारने देश अडचणीत आणलाय, वाढती महागाई अन्…”

आर्यन खान प्रकरणात दावा करणाऱ्या मनिष भंगाळेंचा एकनाथ खडसेंच्या ‘या’ प्रकरणातही होता थेट संबंध

मोठी बातमी! महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना कोरोनाची लागण

आरोग्य विभागाच्या गट-ड च्या परिक्षेतही पुन्हा तोच गोंधळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More