बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एवढं गलिच्छ राजकारण ठाकरे-पवारच करू शकतात, नवाब मलिकांची एवढी कॅपेसिटी नाही”

मुंबई | आर्यन खानच्या केसपासून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी खुलास्यांचा सपाटा लावला आहे. एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासंबंधी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. समीर वानखेडेंवर अनेक आरोप-प्रत्यारोपांनंतर मलिकांनी त्यांचा मोर्चा आता भाजप नेत्यांकडे वळवला आहे.

नवाब मलिकांनी सकाळीच अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांचा ड्रग्ज पेडलर जयदीप राणासोबतचे फोटो शेअर करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. नवाब मलिकांच्या या गौप्यस्फोटानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी नवाब मलिकांसह उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरही निशाणा साधला आहे.

हे गलिच्छ राजकारण फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेच करू शकतात, नवाब मलिकची एवढी कॅपेसिटी नाही, असा घणाघात किरीट सोमय्यांनी केला आहे. 19 दिवसांपासून ईडीच्या धाडी आणि इनकम टॅक्सच्या धाडी सुरू आहेत आणि यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

गेल्या 12 दिवसांपासून मलिक वानखेडेंवर आरोप करत आहेत. वानखेडेंनी 2006 मध्ये लग्न केलं, त्याआधी शेड्युल्ड कास्ट म्हणून नोकरीला लागले, 2007 मध्ये आयएएस, आयआरएस म्हणून सिलेक्ट झाले, तेव्हा का गप्प बसलात? कधी वानखेडेंचं नाव घ्यायचं, कधी अमृता फडणवीसांवर टीका करायची ही नौटंकी आहे की पेड पब्लिसिटी, असा हल्लाबोलही सोमय्यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘त्यांनी सुरुवात केली आहे, मी शेवट करेल’; देवेंद्र फडणवीस आक्रमक

“त्यांना समीर वानखेडेंची एवढी आपुलकी का वाटतीये?”

“दाउदसोबत संबंध असलेला मंत्री मोदींच्या मंत्रिमडंळात कसा?”

अमृता फडणवीसांसोबत फोटोत दिसणारी ‘ती’ व्यक्ती ड्रग्ज पेडलर; नवाब मलिकांच्या दाव्याने खळबळ

विकत आणलेल्या पदार्थांमधील भेसळ कशी ओळखायची? वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More