मोठी बातमी! किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप, म्हणाले…
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अनेक मुद्द्यांवरून राज्यातील वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. त्यात राणा दांपत्याच्या भेटीला गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) शिवसैनिकांनी हल्ला केला.
शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात किरीट सोमय्या जखमी झाल्यानंतर भाजप (BJP) आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. त्यात किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
काल खार पोलिस ठाण्यासमोर जो हल्ला झाला तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केलेला होता. कालचा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशाने संजय पांडेंनी घडवून आणला आहे. किरीट सोमय्यांचा मनसुख हिरेन करायचा असं नियोजन उद्धव ठाकरे आणि संजय पांडेंनी केलं आहे, असा घणाघाती आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
दरम्यान, मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. मला मारण्याचा हा तिसरा प्रयत्न झाला आहे. पहिला वाशिम, दुसरा पुणे आणि तिसरा खार, असा दावा सोमय्यांनी केला आहे. तर शुक्रवार पासून सुरू असलेल्या हाय वोल्टेज राजकीय ड्रामावर अनेक प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे.
थोडक्यात बातम्या-
रोंगाली बिहू कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा जलवा, पारंपारिक वाद्य वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल
युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाची शेवटची खेळी?, धक्कादायक माहिती समोर
किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आक्रमक, उचललं ‘हे’ मोठं पाऊल
“…तर जशास तसं उत्तर देण्याची धमक आमच्यातही आहे”
‘आय रिपीट…’, संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा
Comments are closed.