बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी मुख्यमंत्री असताना माझ्या बायकोचे बंगले चोरीला गेले मी सांभाळू नाही शकलो”

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या 19 बंगल्यांवरून ठाकरे कुटुंबावर आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांचे 19 बंगले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. याच कोर्लई गावाला किरीट सोमय्या आज भेट देणार आहेत. यापूर्वी सोमय्यांनी ठाकरे कुटुंबावर टीकास्त्र डागलं आहे.

गेल्या 17 महिन्यांपासून मी या विषयाचा पाठपुरावा करत आहे. मला त्या ग्रामपंचायतीनंच माहिती दिली आहे आणि त्यावरून आम्ही बोलत आहोत. आम्हाला वास्तविकता काय आहे हे समजून घ्यायचं आहे. काय झालं ते मुख्यमंत्र्यांनीच सांगावं, असं सोमय्या म्हणाले.

आता मुख्यमंत्री खोटं बोलू शकत नाहीत. मुख्यमंत्री साहेब चुका होतात. फक्त जनतेला सांगा की मी मुख्यमंत्री असताना माझ्या बायकोचे बंगले चोरीला गेले मी सांभाळू नाही शकलो, अशी खोचक टीका देखील सोमय्यांनी केली आहे.

दरम्यान, प्रशासनानं आम्हाला अडवलं तर आम्ही काही विरोध करणार नाही पण कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते अडवत असतील तर मात्र काय होईल हे सांगू शकत नाही, असा इशारा देखील किरीट सोमय्यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“आदित्य ठाकरेंवर मानसिक परिणाम झालेला आहे”

तुम्हालाही ‘या’ चुकीच्या सवयी असतील तर आजच बंद करा, होऊ शकतात गंभीर आजार

…म्हणून विराटने दिलेलं ‘ते’ खास गिफ्ट सचिन तेंडुलकरने परत केलं

“मी यादी काढली तर सरकार अडचणीत येईल, तुम्हाला वाटत असेल…”

“षंढ सरकारची षंढ यंत्रणा, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More