बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हे महाविकास आघाडी नव्हे तर महाघोटाळा आघाडी सरकार आहे”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारला आज सत्तेत येऊन तब्बल 2 वर्षे पुर्ण झाली आहेत. एकीकडे महाविकास आघाडी सरकारकडून या विषयी आनंद व्यक्त केला जात असताना भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार आणि त्यांच्या नेत्यांवर सडकून टीका करण्यात येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवत आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची झोप उडाली असून कोणी बेनामी प्राॅपर्टीसाठी आईचा तर कोणी ताई, पत्नीचा वापर करत असल्याचं म्हटलं आहे. आज मुंबईतील मुलूंड येथे बोलत असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. तसेच महाराष्ट्रात सत्तेत असणारं हे महाविकास आघाडी सरकार नसून हे महाघोटाळा आघाडी सरकार असल्याचा घणाघाती हल्ला किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी बोलत असताना घोटाळा करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही, मग ते नवाब असो कि मलिका, असं म्हणत नवाब मलिकांना खोचक टोला लगावला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 28 घोटाळे आम्ही बाहेर काढले असून 29वा नंबर नवाब मलिकांचा असू शकतो, असं मोठं विधानही सोमय्या यांनी केलं आहे.

नवाब मलिका एवढं का घाबरत आहेत?, कि ते आर्थर रोड जेलमध्ये अनिल देशमुखांच्या शेजारची खोली बूक करत आहेत?, असा प्रश्न विचारतही सोमय्यांनी मलिकांवर थेट निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी बायको आणि बहिणीच्या नावावर बेनामी संपत्ती दाखवली तसेच आता भावना गवळीही करत आहेत, असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या

भय्यू महाराज प्रकरणी धक्कादायक खुलासा, चॅटपाहून पोलिसांनाही बसला धक्का

“पहाटेच्या शपथविधीचा प्रसंग माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी सल”

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच, वाचा आजची आकडेवारी

“नारायण राणे म्हंटल्याप्रमाणं इतिहास घडेल अन् सरकार पडेल”

नाना पटोलेंचा स्वबळाचा नारा, मात्र बाळासाहेब थोरातांचा वेगळाच सूर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More