‘किरीट सोमय्या हे ईडीचे पाचवे वसुली एजंट’; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि ईडी अधिकाऱ्यांना लक्ष केलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी करण्यात येत आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी पुन्हा भाजप नेते किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत.
मी 15 फेब्रुवारीला ईडीच्या वसुली एजंटबाबत सांगितले होते. किरीट सोमय्या हे ईडीचे पाचवे वसुली एजंट आहेत, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे. आम्ही भविष्यवानी करायला भारतीय जनता पक्षाचे लोक नाही आहोत. याला उचलणार त्याला उचलणार हे सांगायला. मुंबई पोलीस तपास करणार आहेत, असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.
एका मोठ्या भाजप नेत्याकडे भ्रष्टाचारी पैसा आहे, याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. आम्ही 50 नाव ईडीकडे दिली आहेत. या लोकांचा तपास का होत नाही?, असा प्रश्न त्यांनी केला आहे. जितेंद्र नवलानी ईडीचं रॅकेट चालवतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सुडबुद्धीने पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वसुली रॅकेटमध्ये भाजप नेत्यांचा समावेश आहे. ईडी भाजपची एटीएम मशीन आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊत यांच्या आरोपांनंतर किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोविड घोटाळा बाहेर काढला म्हणून संजय राऊत आरोप करत आहेत. पत्रकार परिषद घेण्याऐवजी पुरावे द्या, असं आवाहन किरीट सोमय्यांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच धाडी का?, भाजपवाले रस्त्यावर भीक मागतात का?”
‘केंद्रीय तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार’, संजय राऊतांचा इशारा
‘ईडी ही भाजपची ATM मशीन आहे’; संजय राऊत कडाडले
“शिवसेनेला त्रास देण्यासाठी ईडीच्या धाडी सुरु आहेत”; संजय राऊतांचा हल्लाबोल
“महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही”
Comments are closed.