बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर किरीट सोमय्या कोल्हापूरकडे रवाना; राजकीय बॉम्ब फोडण्याची शक्यता

मुंबई | भाजप खासदार किरीट सोमय्यांना मुंबई पोलिसांनी स्थानबद्ध केलं होतं. सोमय्यांना कोल्हापूरात जाण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई करण्यात आली आहे. तरीही किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या कोल्हापूरात जाऊन कोणता राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचं सांगितलं जातंय त्यामुळे आता सोमय्या यांच्या भूमिकेकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.

किरीट सोमय्या हे कोल्हापूरात जाण्यासाठी मुंबईच्या सीएसएमटी दाखल झाले. त्यावेळी साहेब तुमच्या जीवाला धोका आहे, असं पोलिसांनी सोमय्यांना समजवून सांगितलं. पोलिसांनी किरीट सोमय्यांची खूप समजूत काढली. तरीही किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला रवाना झाले आहेत. कोल्हापूरला रवाना होतांना सोमय्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका देखील केली आहे.

आज सकाळी मला माझ्याच कार्यालयात 4 तास रोखण्यात आलं. याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देणार का? मला कोल्हापूरात प्रवेशबंदी आहे मग मुंबईला का मला रोखण्यात आलं ? मला कोल्हापूरपर्यंत पोहचू दिलं जाणार नाही. मध्येच ट्रेन रोखतील आणि खाली उतरवतील, असा ही सोमय्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा एक घोटाळा बाहेर काढल्यानंतर ते रूग्णालयात दाखल झालेत. दुसरा घोटळा बाहेर काढला तर ते थेट तुंरूगात जातील. मुश्रीफ यांचे घोटाळे उजेडात आणू नयेत म्हणून महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मुश्रीफ यांना तुंरूगात जावं लागेल याची कल्पना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना देखील आहे. त्यामुळेच मला रोखण्यासाठी ही सगळी ताकद वापरली जात असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मराठमोळ्या ऋतुराजचा धमाका! मुंबईला दिलं 157 धावांचं आव्हान

‘युनिव्हर्सल बाॅस’ ख्रिस गेल म्हणतोय! “मला पाकिस्तानात जायचंय, माझ्यासोबत कोण कोण येतंय?”

मुंबईतून ‘मुन्नाभाई’ला अटक; महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई

कोण आहेत मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

‘…अन्यथा किरीट सोमय्यांना जन्माची अद्दल घडेल’; हसन मुश्रीफांचा पलटवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More