किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला सूचक इशारा, म्हणाले…
मुंबई | राज्यसभा निवडणूक पार पडल्यानंतर आज अखेर निकाल जाहीर झाला आहे. राज्यसभेची ही निवडणूक अधिक रंजक आणि उत्सुकता ताणणारी होती. या निकालात भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झालेत. त्यानंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करत महाविकास आघाडीला टोला लगावला.
राज्यसभा निवडणूक… ठाकरे यांचं माफिया सरकारची उलटी गिनती सुरू झालीये, असं ट्विट करत महाविकास आघाडीला टोला लगावला. संख्याबळ पाहता आमचेच चारही उमेदवार निवडून येतील, असा दावा महाविकास आघाडीचे नेते करत होते.
राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या उमेदवारी साठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये खरी लढत होती. अखेर दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीत धनंजय महाडीक यांनी बाजी मारली. तर संजय पवार यांना पराभवाचा धक्का बसला.
आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण. आजचा विजय सर्वार्थाने महत्त्वाचा विजय आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं. तर भाजपचा हा विजय मी विजय मानत नाही, अस संजय राऊत म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
“निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढवली होती”
“मला टार्गेट का केलं जातंय याबद्दल काहीच माहीत नाही”
RajyaSabha Election Result | देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का!
“चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन डोक्याला तेल लावावं”
पुढील दोन दिवसांमध्ये ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज
Comments are closed.