बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझी लढाई एक प्रकारची क्रांती, आता शांत बसणार नाही”

मुंबई |  काल झालेल्या मोठ्या घडामोडींनंतर भाजप नेते किरीट सोमय्या कराडमधून मुलुंडमध्ये परतले आहेत. त्यावेळी ‘किरीट जी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा प्रकारच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी सोमय्यांचं जंगी स्वागत केलं. त्यानंतर किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

ठाकरे सरकारने कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी रेमडेसिव्हीरच्या औषधांमध्ये घोटाळे केले. ठाकरे सरकारने मयताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं आहे. तर कोरोना काळात स्वत:चे खिसे देखील त्यांनी भरले आहेत. परंतु आम्ही महाराष्ट्र घोटाळेमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करू, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.

मी लढत असलेली लढाई एक प्रकारची क्रांती आहे. त्यामुळे मी आता शांत बसणार नाही. माझी लढाई घोटाळेबाजांविरोधात आहेत. मी यांचे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर ठाकरे सरकारची दादागिरी जास्त दिवस राहणार नाही. पवार आणि ठाकरे यांचे मुश्रीफांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु मी आता थांबणार नाही, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सोमय्यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर सोमय्यांना पोलिसांनी मुंबईमध्ये काहीवेळ स्थानबद्ध केलं होतं. त्यानंतर सोमय्या कोल्हापूरला रेल्वेने रवाना झालं होते आणि त्यानंतर त्यांना कराडला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“अहो पाटील, नरेंद्र मोदी आणि अमित शहांना माहित आहे अजित पवार काय आहेत”

“किरीट सोमय्यांचं नाट्य म्हणजे मराठी रंगभूमीचा अपमान”

‘ब्युरोक्रेसी काहीच नाही, ते आमच्या चपला उचलतात’; उमा भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य

किरीट सोमय्या ईडीचे प्रमुख आहेत का?- सुप्रिया सुळे

“…तर आज महात्मा गांधी यांच्यापेक्षा राखी सावंत महान ठरली असती”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More