‘एवढी लुच्चागिरी तर फक्त…’, राऊतांच्या टीकेवर सोमय्यांचा पलटवार
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) विरूद्ध शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. त्यात शिवसैनिकांनी खार पोलीस ठाण्याबाहेर सोमय्यांवर हल्ला केल्यानंतर हा वाद आता शिगेला पोहोचला आहे.
जर एखादा माथेफिरू, वेडा स्वत:वर हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि राष्ट्रपती राजवट लावा सांगत असेल तर अशा मुर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली होती. राऊतांच्या या टीकेवर सोमय्यांनी जोरदार पलटवार केला आहे.
पोलीस स्थानकाच्या आवारात 70-80 शिवसैनिक गुंडगिरी करत होते हे पोलिसांनी लिहिलं नाही. त्यांनी काय लिहिलं तर शिवसैनिक 3 किमी लांब होेते. अरे टीव्ही चॅनेलवाले लाईव्ह दाखवत होते. एवढी लुच्चागिरी फक्त ठाकरे सरकारच करू शकते, असा घणाघात किरीट सोमय्यांनी केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी स्वत: एक फर्जी एफआयआर दाखल केली आणि त्यात लिहिलं किरीट सोमय्या असं म्हणतात की एकच बारीक दगड लागला. ही काय एफआयआर आहे? फर्जी एफआयआर हे माफिया सेनेचे सरदार उद्धव ठाकरेच करू शकतात, असा आरोप देखील सोमय्यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
“एखादा माथेफिरू हल्ला झाला म्हणून स्वत:च्या ओठाला टोमॅटो सॉस लावून फिरत असेल तर…”
रशियाच्या धमकीला न जुमानता अमेरिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती होणार?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
एलॉन मस्क यांनी तब्बल ‘इतके’ पैसे मोजत खरेदी केलं ट्विटर
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत नितेश राणेंनी दिलं थेट आव्हान, म्हणाले…
Comments are closed.