बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर माझ्या हत्येचा कट ठाकरे सरकार रचत आहे”

मुंबई | किरीट सोमय्या आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाल्यानं सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसैनिकांमध्ये आणि किरीट सोमय्यांमध्ये झालेल्या वादात किरीट सोमय्या पायरीवरून पडले. किरीट सोमय्या काही प्रमाणात जखमी देखील झाले आहेत. त्यातच आता किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.

मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर माझ्या हत्येचा कट ठाकरे सरकार रचत आहे, असा धक्कादायक आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. मला शारिरीक इजा फार झालेली नाही. पण, उद्धव ठाकरे आणि शिवसेना अशाप्रकारे कटकारस्थान करतं. सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि सीआयएसएफच्या अहवालातून हेच सिद्ध होत आहे की, पुणे पोलीस, महापालिकेची काही कर्मचारी आणि शिवसेना हायकमांडने मिळून हा कट रचला होता, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या दोन तीन महिने उठला नाही पाहिजे, असा मार देण्याचा कट होता, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसेच गेल्या 15 दिवसांपासून उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ आहेत. कारण की, संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांचे सगळे पुरावे सापडले आहेत. संजय राऊत, अनिल परब, ठाकरे परिवार आणि रश्मी ठाकरे यांच्या भावाचा समावेश आहे, असा घणाघाती आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या शिवसैनिकांच्या बाचाबाचीमध्ये काही प्रमाणात जखमी झाल्याने किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. स्थानिक पोलीस नाही तर मुख्यमंत्री कार्यालय यापाठीमागे होतं. अनिल परब आणि पाटणकर  यांना वाचवण्यासाठी किरीट सोमय्याला दोन चार महिने शांत करण्याचा कट होता, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

नितेश राणेंची प्रकृती खालावली; ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

“जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, असं स्मारक राज्य सरकार आणि केंद्र सरकार तयार करेल”

“शिवाजी पार्क मैदानावर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं स्मृतीस्थळ उभारण्यात यावं”

बापलेकीचा भावनिक क्षण! सुप्रिया सुळेंनी स्वतःच्या हातांनी शरद पवारांना घातले बूट

लता दीदींच्या अंत्यसंस्कारावेळी शाहरुख खान थुंकला की फुंकला?, पाहा नेमकं काय घडलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More