बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“72 तासात माफी मागा अन्यथा, 100 कोटींचा दावा ठोकणार”

मुबंई | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका करताना दिसत आहेत. सोमय्यांनी ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांंच्यावर किरीट सोमय्यांनी आरटीओ ट्रान्सफर, एसटी तिकीट, दापोलीचा रिसॉर्ट, म्हाडाची जमीन, बीएमसी कंत्राटदार यांसारखे अनेक आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना इशारा दिला आहे.

अनिल परब यांच्यावर किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केले होते. त्या आरोपाला आता परब यांनी कायदेशीररित्या उत्तर देण्याची तयारी दाखवली आहे. सोमय्या यांनी माझ्यावर जे काही आरोप केले आहेत. त्या आरोपांचं पुराव्यासह स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा 72 तासात माफी मागावी,  नाहीतर किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, अशी नोटीस अनिल परब यांच्या वकिलांनी किरीट सोमय्या यांना पाठवली आहे.

सध्या अनिल परब यांच्या तीन प्रकरणाची चौकशी नाशिकच्या लोकायुक्ताकडे चालू आहे. त्याचबरोबर सीबीआय, एसीबी, ईडी एनआयए, गुन्हे अन्वेषन देखील या घोटाळ्याची चौकशी करत आहेत. त्यामुळे अनिल परब यांनी दोन महिन्याचे पाहुणे असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, या प्रकरणामुळे राज्याचं वातावरण तापलेलं दिसत आहे. अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना पाठवलेल्या नोटीसीनंतर काय सोमय्या प्रतिक्रिया देणार ते आता पाहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

‘…म्हणून हे सगळं नाटक सुरू आहे’; देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

”मी माझ्या घरच्यांना सांगितलंय माझे कपडे लाॅन्ड्रीत टाकू नका, नाहीतर…”

”ज्यांच्या भावना नालायक असतात, तेच नालायकासारखं बोलतात”

नाशकात पावसाचं थैमान! गंगापूर धरण ओव्हरफ्लो तर, गोदावरी नदीला पूर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More