बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किरीट सोमय्या आज दिल्ली दौऱ्यावर, करणार ‘या’ नेत्यांच्या घोटाळ्याची चौकशी

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच त्यांनी घोटाळ्याचे आरोप करत हसन मुश्रीफ, भावना गवळी, अजित पवार, आनंदराव अडसुळ आणि आता अर्जून खोतकरांवर निशाणा साधला आहे.  आज किरीट सोमय्या हे दिल्ली दौैऱ्यावर जाणार आहेत.

आजच्या दिल्ली दौैऱ्यादरम्यान किरीट सोमय्या हे हसन मुश्रीफ,भावना गवळी, अजित पवार, अर्जून खोतकर आणि आनंदराव अडसूळांच्या घोटाळ्याची चौकशी संबंधित विभागात करणार असल्याचं त्यांनी ट्विट करत स्पष्ट केलं आहे. तसेच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आर्थिक गैरव्यवहार आणि घोटाळा केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यातच आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज ते थेट दिल्लीला पोहोचले आहेत. नुकताच सोमय्यांनी शिवसेना नेते अर्जून खोतकर यांच्या जालना साखर कारखान्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता.

जालना साखर कारखान्यात जरंडेश्वर सारखाच घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात विश्वास नांगरे पाटील त्यांच्या पत्नी रुपाली नांगरे पाटील आणि सासरे पद्माकर मुळे यांचं नावही किरीट सोमय्यांनी घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

थोडक्यात बातम्या

मलिकांनी ट्विटरवर मध्यरात्री फोडला बाॅम्ब, समीर वानखेडेंचा ‘तो’ फोटो केला शेअर

महाराष्ट्रातील कोरोनाला आला आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

पुण्याच्या महापौरांच्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘इथं’ ठरले लखपती!

“केबल कनेक्शन देण्याइतकं परबांना एसटीचं काम सोप्प वाटतं का?”

“वाह रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More