“मी महाराष्ट्राला वचन देतो की…”; सोमय्यांचं ठाकरे सरकारला ओपन चॅलेंज
मुंबई | महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं घोटाळ्याचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आएनएस विक्रांत प्रकरणी भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. अशातच काही दिवसांच्या शांततेनंतर सोमय्या परत एकदा ठाकरे सरकारवर टीका करत आहेत.
मी काही व्यक्तींसाठी नाॅटरिचेबल असेल बाकी मी व्यवस्थित काम करत होतो. उद्या त्याचा एक नमुना आपल्याला पाहायला मिळेल. मी महाराष्ट्राला वचन देतो की ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा उद्या बाहेर काढणार, असं सोमय्या म्हणाले आहेत.
सोमय्यांनी परत एकदा ठाकरे सरकारचा घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा दिल्यानंतर आता महाविकास आघाडीतील कोणता नेता सोमय्यांच्या रडावर आहे, याची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अशाप्रकारची नाटकं करण्यात निपूण आहेत, अशी टीका देखील सोमय्यांनी केली आहे.
दरम्यान, आयएनएस विक्रांत प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमय्या गायब होते. अटकेपासून संरक्षण मिळाल्यानंतर सोमय्या परत एकदा महाविकास आघाडीवर टीका करत आहेत.
थोडक्यात बातम्या –
Russia-Ukraine War| युक्रेनसाठी अमेरिकेने उचललं मोठं पाऊल
वकील गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील फरार
रणबीरच्या आधी ‘या’ अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं आलियाचं नाव
रेल्वेचा प्रवाशांना दिलासा, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
‘मंजुलिका’ पुन्हा परतली….; ‘भूल भुलैंया 2’ चा धमाकेदार टीझर रिलीज
Comments are closed.