बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किरीट सोमय्या यांना न्यायालयाचा दणका; ‘या’ प्रकरणात न्यायालयात हजर राहावं लागणार

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता सोमय्या राजकीय वर्तुळात चर्चाचा विषय बनले आहेत. त्यातच आता न्यायालयाने किरीट सोमय्या यांना दणका दिला आहे.

मुंबईतील शिवडीच्या मेट्रोपाॅलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयाने सोमय्या यांचे कान टोचले आहेत. किरीट सोमय्यांनी 1 एप्रिलला गृहनिर्माण विभागाचे अधिकारी प्रविण कलमे यांच्यावर आरोप केला होता. प्रविण कलमे गृहनिर्माण विभागाचे सचिन वाझे आहेत, असं सोमय्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर प्रविण कलमे यांनी किरीट सोमय्यांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसआरए आणि म्हाडामधून 100 कोटी वसुल करण्याचे आदेश दिले आहेत. हे वसुलीचे काम कलमे यांच्याकडे आव्हाडांनी दिलं आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. कलमे यांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान तथ्य आढळलं आहे. त्यामुळं सोमय्यांना 22 सप्टेंबर आणि 5 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.

दरम्यान, अर्थ फाउंडेशनचे प्रविण कलमे यांनी असं म्हटलं आहे की, सोमय्यांना आता आरोप सिद्ध करावे लागणार आहेत. सोमय्या त्यांचे राजकारणात चमकण्यासाठी खोटे आरोप करत आहेत. त्यामुळं सोमय्या यांनी माझ्यावर केलेले आरोप न्यायालयात सिद्ध करावेत, असं कलमे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

“72 तासात माफी मागा अन्यथा, 100 कोटींचा दावा ठोकणार”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा ‘…म्हणून हे सगळं नाटक सुरू आहे’; देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More