मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर काही गंभीर आरोप केले होते. जर किरीट सोमय्यांनी ठाकरे परिवाराचे 19 बंगले दाखवून द्यावे नाही तर त्यांना जोड्याने मारू, असं संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना आव्हान दिलं होतं. त्यातच आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर तोफ डागली आहे.
किरीट सोमय्या आपल्याचं चपलेने स्वत:लाच मारणार आहे. किरीट सोमय्यांनी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांच्या नावे कोट्यावधींचा घोटाळा केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पवई पेरूबाग जमीन प्रकरणी 433 बोगस लोकांना घुसवलं. अमित शहांच्या नावे किरीट सोमय्यांच्या नेतृत्वाखाली वसुली झाली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. हा घोटाळा 200 ते 300 कोटींचा असून आपल्याकडे ट्रकभर पुरावे आहेत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आपल्या मागे काय चाललयं हे फडणवीसांना माहिती नसावं. असे घोटाळे फडणवीस करत नसतील, असं मला वाटत नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. किरीट सोमय्या यांनी फक्त ईडीच्या नावे नाही तर देवेंद्र फडणवीसांच्या नावे देखील वसूली केली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी फडणवीसांना 50 कोटी देणार असल्याचं सांगितलं होतं, असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोपांची खैरात केली आहे. भाजप नेत्यांच्या नावे वसूली केल्याचे गंभीर आरोप संजय राऊत यांनी केले आहेत. ‘भाजपचे चंद्रकांत पाटील वगैरे नेतेमध्ये पडत आहेत. परंतु, त्यांनी मध्ये पडू नये अन्यथा उघडे पडतील. उगाच या प्रकरणामध्ये पडू नका. लोक किरीट सोमय्या यांची धिंड काढणार असून तुम्ही जर त्यामध्ये सहभागी झालात तर लोक तुमचीही धिंड काढतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
“…तेव्हा मी आवर्जून देवेंद्रजींकडून डोसे बनवून घेतले”
“बायको हट्टला पेटली तर नवऱ्याने 3 दिवस तिच्यासोबत झोपू नये”
“किरीट सोमय्या म्हणजे राजकारणातील शक्ती कपूर”
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, पाहा ताजे दर
भरधाव बाईकची ट्रकला धडक; काळजाचा थरकाप उडवणारा अपघात
Comments are closed.