महाराष्ट्र मुंबई

धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ?; ‘या’ नेत्याने निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंविरोधात भाजप नेते किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

मी महाराष्ट्रातील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्नी, मुले आणि मालमत्तांबद्दल तथ्ये लपविल्याप्रकरणी आणि महत्त्वाची माहिती जाहीर न केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली, असं किरीट सोमय्यांनी सांगितलंय.

धनंजय मुंडेंनी सार्वजनिकरीत्या दोनदा लग्न झाल्याचं कबूल केलंय. दोन्ही बायका आणि मुलांचीही त्यांनी जबाबदारी घेतली. पण ऑक्टोबर 2019 मध्ये निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दोन बायका आणि मुलांची माहिती लपवली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

धनंजय मुंडेंवर झालेल्या गंभीर आरोपांवर एकनाथ शिंदे म्हणाले…

केंद्राने नकार दिला तर आम्ही दिल्लीकरांना मोफत लस देऊ- अरविंद केजरीवाल

भाजपचे सोलापूरचे उपमहापौर राजेश काळेंना दणका; पक्षाने केली मोठी कारवाई

“संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो, 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला?”

“धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा, मंत्रीपदावर राहण्याचा त्यांना हक्क नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या