मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) राणा दांपत्याच्या भेटीला गेले असता शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. यानंतर भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेतली आहे.
शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात सोमय्यांच्या गाडीची काच फुटली. तसेच सोमय्यांच्या हनुवटीला जखम झाली असून त्यातून रक्त येत असल्याचे फोटो या हल्ल्यानंतर समोर आले. सोमय्यांना झालेल्या दुखापतीवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी शंका उपस्थित केली. त्यानंतर आता सोमय्यांचे या दुखापतीसंदर्भात केलेल्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल समोर आले आहेत.
किरीट सोमय्यांना 0.1 सेमीची जखम झाली असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे. सोमय्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची सूज नव्हती. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नसून जास्त रक्तस्रावही नव्हता झाला, अशी माहिती या अहवालातून समोर आली आहे.
दरम्यान, मुंबईतील भाभा रूग्णालयात किरीट सोमय्यांच्या दुखापतीसंदर्भात वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल समोर आला असून किरीट सोमय्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
थोडक्यात बातम्या-
“आपल्या खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी अजून किती खोटेपणा कराल?”
छगन भुजबळांना ईडीचा मोठा दिलासा, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पुढील 2 दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज
“यांच्या धमन्यांमध्ये रक्ताऐवजी टोमॅटो सॉस भरलाय म्हणूनच…”
“किरीट सोमय्या भाजपचा नाचा आणि देवेंद्र फडणवीस त्याचे सूत्रधार”
Comments are closed.