बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मीडियाची मदत घेत सोमय्या खोटे आरोप करत…’; मनिषा कायंदेंचा सोमय्यांवर घणाघात

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संपत्तीची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर दौरा करणार होते. काल रविवारी सोमय्या मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने निघाले असता, सोमय्यांना स्थानबद्ध करत त्यांना कराड येथे पोलिसांनी अडवलं होतं. त्यानंतर आज सोमवारी कराडमध्ये सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत.

शिवसेना प्रवक्त्या आमदार मनिषा कायंदे यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला आहे. किरीट सोमय्यांना सतत प्रसिद्धी झोतात राहायला आवडतं. सोमय्यांचा हा जूनाच छंद आहे. पोलिसांनी काल रविवारी आदेश देवूनही सोमय्यांनी स्टंटबाजी केली आहे. तसेच सोमय्यांनी बळजबरीने मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं आहे. सोमय्यांची ही जुनीच सवय आहे, अशी टीका कायंदे यांनी सोमय्यांवर केली आहे.

राज्याच्या गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे की, किरीट सोमय्यांना कुठलीही अटक झाली नाही. तरीही हे महाशय खोटे बोलत आहेत. मीडियाची मदत घेऊन खोटे आरोप करत प्रसिद्धीत राहण्याचा एकमेव उद्योग सोमय्या करत आहेत, असं म्हणत मनिषा कायंदे यांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषेद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बंगल्याचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे.

 

वाचा ट्विट –

 

थोडक्यात बातम्या –

रश्मी ठाकरेंच्या संपत्तीबाबत सोमय्यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा पलटवार!

“केवळ मोदी लाटेच्या जीवावर निवडणुका जिंकू शकत नाही कारण…”; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य!

…म्हणून प्रसिद्ध अभिनेता विजयने आई-वडिलांवर केले गंभीर आरोप, जाणून घ्या प्रकरण!

“ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग केला जातोय, मात्र कर नाही त्याला डर कशाला”

चिमुकलीला पाण्यात बुडताना पाहून कुत्र्याने…; व्हिडीओ व्हायरल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More