बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आता हा नेता अनिल देशमुखांच्या वाटेने जाणार’; किरीट सोमय्यांच्या नव्या दाव्याने खळबळ

मुंबई | मागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना धारेवर धरलं आहे. सोमय्या सतत महाविकास आघाडीतील कोणत्या ना कोणत्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावताना दिसतात. आता सोमय्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्राजक्त तनपुरे यांची काल ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. यावरून सोमय्या यांनी तनपुरे हे अनिल देशमुख यांच्या वाटेवर असून त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा  केला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्याचे, नेत्यांचे अनेक घोटाळे, उद्योग बाहेर येत आहेत. आता यशवंत जाधव, अनिल पवार आणि प्राजक्त तनपुरे यांच्यावरही कारवाई होणार असल्याचंही सोमय्यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले, “शरद पवारांच्या आशीर्वादाने अनिल देशमुख यांनी बेनामी पद्धतीनं तनपुरे यांच्याद्वारे रामगणेश गडकरी साखर कारखाना काबिज केला. 100 कोटींची संपत्ती 13 कोटीत दिली गेली आणि पुढे तीच संपत्ती तनपुरे यांनी अनिल देशमुखांना पास ऑन केली, असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला आहे. शिवाय त्याचे पुरावे बाहेर आले असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, यावेळी किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही अनेक गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, शरद पवार काय करू शकतात हे राज्याच्या जनतेला कळेल. लाखो शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने एनसीपीच्या नेत्याने वळवण्यात आले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“ख्रिसमसदिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार”

‘..अन्यथा रस्त्यावर फिरकूही देणार नाही’; पडळकर कडाडले

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

भर रस्त्यावर 8 वर्षाच्या मुलीसमोर पोलिसाने कानशिलात लगावली; पाहा व्हिडीओ

“…मग तुमच्याविरोधात कारवाई का करू नये?”, न्यायालयाचा नवाब मलिकांना सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More