बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्यांनी काँग्रेस नेते राहूल गांधींचा पपलू केलाय’; किरीट सोमय्यांचा घणाघात

मुंबई | विधानसभेचं हिवाळी अधिवेशन(Winter session) नुकतचं पार पडलं. अधिवेशनात विरोधक आणि राज्य सरकारमध्ये चांगलीच खडाजंगी रंगली होती. विधानसभेच्या अध्यक्ष निवडणुकीवरूनही अधिवेशनात राजकारण रंगल होतं. आता भाजप नेते किरीट सोमय्या (kirit Somayya) यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून टोला लगावला आहे.

“माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा काँग्रेसचा कोणताही नेता विधानसभेचा अध्यक्ष होऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची होती. त्यातून त्यांनी काँग्रेसची फसवणूक केली. त्यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांचा पपलू केला,” असा घणाघात सोमय्यांनी केला आहे.

महाविकास आघाडीकडे 170 आमदार आहेत, भाजपकडे 105, त्यामुळे गुप्त मतदान झालं असतं तर काय फरक पडला असता? काँग्रेसचा कोणताही नेता अध्यक्ष होऊ नये म्हणून आवाजी मतदान पद्धतीचं नाटक केलं. तसेच राज्यपालांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला ही हकिकत आहे, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्ष निवडणूकीवरून विधानसभेचं वातावरण चांगलचं तापलं होत. निवडणुक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात यावी, असं मत राज्य सरकारचं होतं. तर विरोधकांनी गुप्त मतदान पद्धतीने निवडणुक घेण्यास विरोध केला होता. अखेर गुप्त मतदान पद्धतीनेचं निवडणुक घेण्यावर शिक्कामोर्तब झाला.

थोडक्यात बातम्या-

“पंतप्रधान मोदी मास्क लावत नाही म्हणून लोकही मास्क लावत नाहीत”

Corona: ‘मुंबईच्या बाहेरुन येणारी लोकं शिस्त बिघडवतात’; किशोरी पेडणेकर भडकल्या

Corona : कोरोना होऊ नये म्हणून घेतले 4 डोस, तरीही शेवटी…

WHOनं वाढवलं जगाचं टेंशन; ‘कोरोनाची त्सुनामी येणार अन्…’

Corona: सर्वात पहिल्यांदा लस घेतलेल्या अभिनेत्रीला कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More