महाराष्ट्र मुंबई

अंधेरीत पुलाचा मोठा भाग कोसळला; काय म्हणाले किरीट सोमय्या?

मुंबई | अंधेरीत गोखले पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुलाखाली कोणी दबले असेल तर त्यांना वाचवण्यावर प्राथमिकता असल्याचं खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. 

अंधेरी रेल्वे स्टेशनपासून अर्धा कि.मी अंतरावर हा पूल आहे. कोणी दबलेलं असेल तर त्यांना बाहेर काढणं आणि रेल्वे वाहतूक सुरळीत करणं याला प्राथमिकता असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

दरम्यान, MMRDA आणि मुंबई महापालिकेनं हा पूल बांधला होता, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिलीय. पूल कसा कोसळला हे जाणून घेतल्यानंतर दोषीवर कारवाई होईल, असंही सोमय्या म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या –

-धक्कादायक!!! अंधेरीमध्ये पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर कोसळला

-30 लाखांचा चेक फडकवत भाजप नेता म्हणाला, ‘बोला आता तरी तिकीट देणार का’?

-आम्ही आमदार तुमचे नोकर आहोत- बच्चू कडू

-…अन् आकाश अंबानीनं आईच्या हातातून बायकोचा हात सोडवला!

-येणाऱ्या काळात संजय पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद देणार- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या