बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कर्ज मिळवताना 7 पिढ्या जातात, तुम्हाला 7 तासात 85 कोटींचं कर्ज मिळालंच कसं?”

पुणे | गेल्या काही दिवसात माजी खासदार किरीट सोमय्या आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात झालेला राजकीय वाद राज्यातील सगळ्यांनी पाहिला आहे. किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून आलं आहे. यावेळी कोरेगाव तालुक्यातील चिमगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्यावरून किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर निशाणा साधला आहे.

जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक संचालकांनी माझी तीनवेळा भेट घेतली आहे. त्यांच्या विनंतीवरून त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मी याठिकाणी आलो आहे. बेनामी पद्धतीने हा कारखाना घेतला आहे. त्यांचा मालक कोण? या कारखान्यांची पळवा पळवा करून त्याची लपवा छपवी करण्याचे काम पवार परिवार करत आहेत. यापूर्वी केंद्रात तुमची सत्ता होती, आजारी कारखान्यांना मदत करणे तुमचे काम होते. मग हा कारखाना बंद पडलाच कसा? असा सवालही किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला विचारला आहे.

सामान्यांना कर्ज मिळवताना त्यांच्या सात पिढ्या जातात. तुम्हाला सात तासांमध्ये 85 कोटींचे कर्ज कसे मिळाले? लवकरच हा घोटाळा बाहेर येणार आहे. मी पाच टप्प्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु अजूनही मला या कारखान्याचा मुळ मालक सापडला नाही. गुरू कमोडिटीचा मालक सध्या तुंरूगात आहे. उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याची रेषा पवार परिवारांपर्यंत पोहचणार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही महिन्यापासून किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेले घोटाळे बाहेर काढले आहेत. त्यामुळे त्या नेत्यांना ईडीची नोटीस देखील आली आहे. किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर अजित पवार काय बोलणार, ते आता पाहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘3 तारखेचं प्रकरण संपूर्ण खोटं, व्हिडीओत दिसणार व्यक्ती भाजपचा उपाध्यक्ष’; नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

एनसीबीच्या कोठडीत बाप-लेकाची भेट, शाहरुखला पाहून आर्यन ढसाढसा रडला

वंचितचा सर्व राजकीय पक्षांना धक्का; पोटनिवडणुकीत 6 जागांवर मिळवलं यश

आता Airtel देणार Jioला टक्कर! 5G नेटवर्कसाठी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

‘शेतकऱ्यांना चिरडणारी थार कार आमचीच…’; केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची कबुली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More