मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चर्चेत आहे. याप्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचा थेट संबंध जोडला जात आहे. त्यामुळे याप्रकरणात संजय राठोड यांना तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी भाजपकडून सतत केली जात आहे.
याप्रकरणावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी होईल, त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत संजय राठोड यांच्या अटके संदर्भात थेट उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले आहेत.
ज्यामध्ये त्यांनी मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासह अटकेचीही मागणी केली आहे. सोबतचं याप्रकरणात ईतके पुरावे असताना मंत्री संजय राठोड यांना अटक का होत नाही? मुख्यमंत्री संजय राठोडांना अटक करण्याबाबत शरद पवारांच्या आदेशाची वाट बघत आहेत का?, असा सवालही किरीट सोमय्या यांनी यावेळी सरकारला विचारला आहे.
ठाकरे सरकार चे मंत्री संजय राठोड ला ताबडतोब अटक करा @BJP4Maharashtra pic.twitter.com/1y8HQSJdL8
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 13, 2021
थोडक्यात बातम्या-
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
आरजे राघव… पोराच्या एका व्हिडीओनं आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलंय!
“दाढी वाढवून स्वत:ची शिवरायांशी तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना राजधर्म कळणार नाही”
“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरी बाणा दाखवणार का?”
“महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय?”