बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार आणि वाधवान कुटुंबाचे घरचे संबंध; त्यांच्या परवानगीशिवाय पत्र मिळणे अशक्य”

मुंबई | वाधवान कुटुंबीय आणि पवार कुटुंबीय यांच्यात जवळचे संबंध आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या परवानगीशिवाय वाधवान यांना यांना पत्र मिळणं अशक्य आहे, असा गंभीर आरोप भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

शरद पवार आणि वाधवान कुटुंबाचे घरगुती संबंध आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे. म्हणूनच पवारांनी किंवा देशमुखांनी जो आदेश दिला तो आदेश त्या अधिकाऱ्याने पाळला. म्हणून मी म्हणतो की पवारांच्या परवानगीशिवाय ते पत्र वाधवान कुटुंबाला मिळणे अशक्य आहे, असं सोमय्या म्हणाले.

सीबीआयने त्यांना नॉन बेलेबल वॉरंट इश्यू केलंय हे महाराष्ट्र सरकारला माहिती आहे. मग सर्वसामान्यांना एक न्याय आणि बड्यांना दुसरा न्याय का? अजब आहे सरकार आणि गरज त्याचा कारभार, अशा शब्दात त्यांनी सरकारचा समाचार घेतला.

दरम्यान, अमिताभ गुप्तांच्या विरोधात ताबडतोब एफआयआर रजिस्टर झाला पाहिजे. मी स्वत: आज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे., असं त्यांनी सांगितलं. तसंच अनिल देशमुख यांची ताबडतोब हकालपट्टी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

ट्रेडिंग बातम्या

महाराष्ट्रात नक्की चाललंय काय?, गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा- चित्रा वाघ

वाधवान कुटुंबाला फिरण्यासाठी विशेष पत्र देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर गृहमंत्र्यांनी केली कारवाई!

महत्वाच्या बातम्या-

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाग्रस्तचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी उचललं कडक पाऊल

वुहानमधील भारतीय तरुणी म्हणते, “…म्हणून मी भारतात परत येणार नाही”

चौकशी म्हणजे निव्वळ डोळ्यात धुळफेक; अधिकाऱ्याला निलंबित करा- प्रसिद्ध IAS खेमका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More