बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनानंतर ‘नाले सफाई घोटाळा’ धारावीला बुडवणार; सोमय्यांचं सेनेवर टीकास्त्र

मुंबई | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा आणि नालेसाफाईवरून त्यांनी शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोनानंतर नाले सफाई घोटाळा धारावीला मुंबईला बुडवणार असल्याची टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे. तसंच ठाकरे सरकारची नालेसफाई फक्त कागदावरच असल्याची टीका त्यांनी केलीये. त्यांनी मिठी नदीच्या नाल्याच्या व्हीडिओ ट्विट करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबईच्या नालेसफाईवरून विरोधक आणि मुंबई महापालिकेमध्ये प्रत्येक पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर जुंपलेली असते. याही वर्षी नीलेसफाईच्या कामाला सुरूवात होताच सोमय्यांनी सेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेला लक्ष्य केलं आहे.

दुसरीकडे रविवारी सोमय्यांनी राज्य सरकारध्ये समन्वयाचाअभाव असल्याचं म्हटलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकाच मुद्द्यावर दोन विरोधाभासी मतं सांगत राज्य सरकारवर त्यांनी टीकास्त्र सोडलं होतं.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“आम्ही मोदींसारखे ड्रामेबाज नाही, जेव्हा मत हवं असतं तेव्हा ते मजुरांचे पाय धुतात”

उद्धवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार; सोमय्यांचा पुन्हा राज्य सरकारवर निशाणा

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातील अमुल्य साहित्य ‘रत्न’ निखळलं; मुख्यमंत्र्यांची मतकरींना आदरांजली

बारामतीत पुन्हा कोरोनाबाधित रूग्ण आढळला; पाहा ‘मुंबई ते बारामती कोरोना कनेक्शन…!’

केंद्रावर टीका करण्याआधी तुमच्या तिजोरीतून महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगा; चंद्रकांतदादा भडकले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More