बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अनिल परब यांनी आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी”

मुंबई | परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळीच ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा मारला आहे.

अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाली असल्याचं म्हटलं जात आहे. अनिल परबांवरील कारवाईवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिलीये. ते एबीपी माझाशी बोलत होते.

ईडीची कारवाई सुरु, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केलीये.

फसवणुकीची कारवाई ठाकरे सरकारने केली. उद्धव ठाकरेंनी अशा पद्धतीने अनिल परब यांचा काटा काढला. फसवणुकीच्या ऑर्डरवर आदित्य ठाकरे यांनी स्वाक्षरी केली आहे. म्हणून मी आताचं ठाकरे कुटुंब माफिया आहे, असं मी म्हणतो. सगळ्यात पहिली माहिती ठाकरे कुटुंबाला कळते, कारण ते घोटाळे करतात, असं ते म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड

“आधी संघाच्या कार्यकारिणीमध्ये सर्व जातींना आरक्षण देण्याचा ठराव करा, मग आमच्यावर बोला”

धक्कादायक बातमी समोर; अभिनेत्री विदीशा मुजूमदारचा मृत्यू

मोठी बातमी! मंत्री नवाब मलिकांना ईडीचा दणका

“उद्या मी अर्ज भरणार, त्याआधी पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More