महाराष्ट्र मुंबई

“…तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही”

मुंबई | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी आपण 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. तसेच आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली, असा मोठा खुलासा केला. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

3 महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळातून बाहेर रहावं. त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी एक व्हीडिओ ट्विट केला आहे.

धनंजय मुंडेंवर जे आरोप होत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मिता, संस्कृतीला धक्का पोहचला आहे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांवर बंगलो लपवण्याचा आरोप करण्यात आलाय, तर दुसरीकडे त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप केला जातोय. ठाकरे सरकारची किती दयनीय अवस्था आहे. महाराष्ट्राची संस्कृती काय, इथली अस्मिता काय, या सगळ्यावर पाणी फिरवण्याचं काम ठाकरे सरकार करीत आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्र्यांवर बंगले, तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप”

कोरोना विरोधातील लढाईत नरेंद्र मोदी यांचं काम जगात सर्वोत्तम- देवेंद्र फडणवीस

करुणासोबत सहमतीनं संबंधात; आम्हाला दोन मुलंही आहेत- धनंजय मुंडे

बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांचा अत्यंत धक्कादायक खुलासा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र; मराठा आरक्षणप्रश्नी केली ‘ही’ मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या